जामखेड प्रतिनिधी

श्रीक्षेत्र निस्पृहबाबा अरणगाव पायी दिंडी सोहळयासाठी प्रा राम शिंदे साहेबांनी मोठ्इ श्रध्देने आणि भक्तीभावाने तीन वर्षापुर्वी निस्पृहबाबा चरणी अर्पण केलेल्या रथाचे पंढरीकडे प्रस्थान झाले.

अरणगाव येथील श्रीक्षेत्र निस्पृहबाबा पायी दिंडी सोहळयासाठी तीन वर्षापुर्वी तत्कालिन पालकमंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी ६ लाख २५ हजार रूपये खर्चाच्या सागवानी लाकडात अत्यंत सुबक नक्षीकाम केलेला रथ निस्पृहबाबा चरणी अर्पण केला होता. तर या रथाचे सारथ्य करण्यासाठी ५ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा ट्रक्टर प्रा राम शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक, कुसडगावचे भुमिपुत्र,भोसरी(पुणे)येथील उदयोजक राजेंद्र देशपांडे यांनी दिला.

मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत प्रा राम शिंदे साहेबांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातच कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात पंढरीची वारी बंद राहिली. योगायोगाने प्रा राम शिंदे हे पुन्हा आमदार झाले असून, राज्यातही जनतेच्या मनातील सरकार आले आहे. तीन वर्षापासून बंद असलेली पंढरीची वारी यावर्षी पुन्हा मोठया उत्साहात होत असून, प्रा राम शिंदे यांनी पालकमंत्री असताना मोठ्या श्रध्देने आणि भक्तीभावाने निस्पृहबाबा चरणी अर्पण केलेला रथ पंढरीकडे प्रस्थान झाला आहे.

ह.भ.प. योगीराज रणजीतबापु महाराज व प्रा राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शंकरराव शिंदे यांच्या शुभहस्ते अरणगाव येथुन शुक्रवार दि १ जुलै रोजी सकाळी या रथास श्रीफळ वाढवून पायी दिंडीचे पंढरपुर कडे प्रस्थान करण्यात आले.

या वेळी आमदार प्रा राम शिंदे यांच्या मातोश्री भामबाई शिंदे, उद्योगपती राजुशेठ देशपांडे, सरपंच अंकुश शिंदे उपसरपंच आप्पासाहेब राऊत, सरचिटणीस लहुजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य डॉ ससाणे, रमजान शेख, अविनाश सोले पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष नन्नवरे, बापू मामा गदादे, अमोल निगुडे, आंबदास राऊत, आनंदराव शिंदे, उद्धव हुलगुंडे चेअरमन, शिवानंद स्वामी विकास डमाळे, विष्णू निगुडे, दत्ता परदेशी, महेश कुलकर्णी, तुषार बोथरा, वायकर महाराज, भिसे महाराज, खोसे महाराज, ओम महाराज, जानदेव मेंगडे मामा व आरणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

अरणगाव येथील श्रीक्षेत्र निस्पृहबाबा पायी दिंडी सोहळयासाठी तीन वर्षापुर्वी तत्कालिन पालकमंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी ६ लाख २५ हजार रूपये खर्चाच्या सागवानी लाकडात अत्यंत सुबक नक्षीकाम केलेला रथ निस्पृहबाबा चरणी अर्पण केला होता. तर या रथाचे सारथ्य करण्यासाठी ५ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा ट्रक्टर प्रा राम शिंदे साहेबांचे कट्टर समर्थक, कुसडगावचे भुमिपुत्र,भोसरी(पुणे)येथील उदयोजक राजेंद्र देशपांडे यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here