जामखेड प्रतिनिधी

एन उन्हाळ्यात टँकरने पाणी देऊन जगवलेली पाटोदा व भवरवाडी परीसरातील लिंबोनी फळबागांची झाडे काल झालेल्या वादळी पावसाने उन्मळून पडली. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांच्या फळबागांचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी नुकतेच जामखेड येथील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

जामखेड तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव परीसरात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतातील झाडे उखडून पडले असुन शेतीचे देखील नुकसान झाले आहे. भर उन्हाळ्यात या लिंबोनीच्या झाडांना टँकरने पाणी देऊन पोटच्या मुला प्रमाणे जपले होते मात्र या वादळी पावसाने या लिंबोनीच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी महसुल विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या वेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद (दादा) कार्ले, भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस डॉ महेश मासाळ, प्रा अण्णासाहेब ढवळे, प्रवीण बोलबट, मोहन देवकाते, भाऊ शेळके, संदीप कवादे, नाना वाघमोडे, वैभव कार्ले सह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here