मोगलपुरा येथिल खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस इफ्तार पार्टीने संपन्न

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील जुनं जामखेड असलेल मोगलपुरा गल्ली या गल्लीत खाजमोद्दीन बाबा दर्गाची दर्गा प्राचीन कालापासून आहे. या दर्ग्याच्या दर्शनासाठी सर्व जाती धर्मातील नागरीक येतात. या दर्ग्याचा उरूस १३ मार्च रोजी सर्व जाती धर्मातील नागरीक मोठया उत्साहाने साजरा करतात. हा दर्गा म्हणजे जामखेड तालुक्यातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे.

यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी बोलतांना म्हणाले की मोगलपुरा यंग पार्टीने खजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस हा रमजान महिन्यात आल्याने कोणताही गाजा वाजा न करता उपवासाची सांगता करून इप्तार पार्टीने साध्या पद्धतीने व शांततेत साजरा करून समाजपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा आदर्श इतर संघटांनी घेणे हि काळाची गरज आहे असे मत पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी व्यक्त केले.

खाजमोद्दीन बाबा दर्गाच्या उरूस १३ मार्च रोजी होता परंतु हा उरूस रमजान महिन्यात आल्याने मोगलपुरा यंग पार्टीने वेगळा निर्णय घेतला. व इप्तार पार्टीने उरूस साजरा करून एक नवीन आदर्श निर्माण केला. रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव निरंकार उपवास करून नमाज पठन करतात . रमजान महिन्यात १३ मार्च रोजी खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस आल्याने मोगलपुरा यंग पार्टीचे अध्यक्ष आबेद शेख व त्यांचा सदस्यांनी एक मोठा निर्णय घेतला कि रमजान महिन्यात हा उरूस आल्याने बॅन्जो ; ढोलीबाजा ; कवॉली ; मिरवणुक या गोष्टींना फाटा देत यास असंख्य कार्यक्रम रद्द करून उपवासाची सांगता म्हणजे इप्तार पार्टीने करण्याचा निर्णय घेतला व त्याला सर्वांनी दुजोरा दिला.

यावेळी खाजमोदीन बाबा दर्ग्याचा उरूस मोगलपुरा यंग पार्टीने इप्तार पार्टीने मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा केला. उरूस निमित्त जे मुस्लीम बांधव उपवास करतात त्यांच्यासाठी दर्ग्या समोर दि १३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता इप्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजीत केला या इप्तार पार्टीमध्ये कलिंगड, खरबुज, पेंड खजुर, भजे, चिकु, द्राक्षे, सफरचंद, केळी व शाही शरबत असे विविध प्रकारचे पदार्थ आणुन रोजा इप्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजीत करून मनमुरादपणे सर्व पदार्थाचा आनंद घेतला. मुस्लीम बांधवानी रोजा सोडुन खाजमोद्दीन दर्ग्याला पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, उपनगरध्याक्ष पोपट राळेभात, नगरसेवक प्राचार्य विकी घायतडक, मोहन पवार, अर्जुन म्हेत्रे, शिवसेना युवा नेते आकाश बाफना, अभियंता प्रदीप कटकधोंडे सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार, उमर कुरेशी, शिवकुमार डोंगरे, मुस्लीम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहर काझी, मुख्तार सय्यद, इस्माईल शेख, हाजी नादीर शेख, कॉग्रेसचे प्रदेश सचिव राहुल उगले, वसीम कुरेशी, आरीफ शेख, प्रदीप टाफरे, मयुर भोसले, यांच्या हस्ते चादर चढवून मोठ्या आनंदाने उरूस साजरा केला.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, जातीय सलोखा राखण्यासाठी दरवर्षी मोगलपुरा यंग पार्टीचा उपक्रम स्तुत्य आहे. हा दर्गा प्राचीन कालापासून आहे. या दर्ग्याच्या दर्शनासाठी सर्व जाती धर्मातील नागरीक येतात.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की, सामाजिक एकतेसाठी असे उपक्रम अगदी योग्य आहे. रमजान मध्ये राम तर दिपावली मध्ये अली हे शब्द येतात हेच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. रमजान महिन्यात ऊरूस येणे हे पवित्र योग मानला जातो, शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हा कार्यक्रम योग्यच आहे. यावेळी उपनगराध्याक्ष पोपट राळेभात, कॉग्रेसचे प्रदेश सचिव राहुल उगले,विद्युत महामंडळाचे अभियंता प्रदीप कटक धोंड आकाश बाफना, प्राचार्य विकी घायतडक, प्रदीप टाफरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून मोगलपुरा यंग पार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मोगलपुरा यंग पार्टीचे अध्यक्ष आबेद शेख, सल्लागार ॲड एजाज पठाण, वाजीद पठाण, समीर शेख, इकलास शेख ,आयान शेख, दानिश पठाण, आर्शद सय्यद, जिसान शेख, अरमान शेख, नुमान शेख, आयान शेख, हिदायत शेख, तैफिक शेख, अदनान शेख, अफवान शेख, आमन खान, उबेद शेख, राहील शेख, शाहादात सय्यद, साहिल शेख, अंजर शेख, आशकान शेख, रिहान पठाण, शायान सय्यद, अफवान शेख, नुमान शेख आदिनी इप्तार पार्टीमध्ये विशेष परिश्रम घेऊन खाजमोद्दीन बाबा दर्ग्याचा उरूस मोठा गाजा वाजा न करता रमजान महिन्याचे औचित्त साधुन साध्या पद्धधतीने शांततेत साजरा केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जाकीर शेख यांनी केले तर आभार प्राचार्य. सादेक शेख यांनी मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here