पाथर्डी /औरंगाबाद, प्रतिनिधी

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही म्हणून पाथर्डी येथे कट्टर समर्थकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तर दुसरी घटना औरंगाबाद येथे घडली असुन पंकजा मुंडे समर्थकांनी औरंगाबाद येथील भाजपा कार्यालयासमोर गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जाते अशी भावना त्यांच्या समर्थकांत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गर्जे याना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तय दुसरी औरंगाबाद मध्ये घडली आहे. पंकजा मुंडे समर्थकांनी औरंगाबाद येथील भाजपा कार्यालयासमोर गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या औरंगाबाद येथील समर्थकांनी आज दुपारी औरंगाबादमधील भाजपा कार्यालयात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मुंडे समर्थकांनी भाजपा कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here