जामखेड प्रतिनिधी

हॉस्पिटल ची सेवा करत असताना कोणा एका व्यक्तीमुळे ती सेवा पुर्ण होत नाही. हॉस्पिटल मध्ये आसलेल्या सर्वच डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या टीमवर्क शिवाय कोणतेच काम शक्य नाही. तसेच नव्‍याने झालेल्या या जीवन साई हॉस्पिटलला माझे सर्वतोपरी सहकार्य राहील असे मत नगर येथील आर्थॉपेडीक डॉक्टर राहुल पंडित यांनी हॉस्पिटल च्या उद्घाटनप्रसंगी केले.

दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी तसेच गरजु व गरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी या उद्देशाने जामखेड येथे दि ७ जुन २०२२ रोजी शहरातील बस स्थानक शेजारी महाराष्ट्र बँक रोड जवळ या जीवन साई हॉस्पिटल चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

पुढे बोलताना डॉ. राहुल पंडित म्हणाले , की जामखेड येथील जीवन साई हॉस्पिटल मध्ये माफक दरात आणि कमी वेळेत रुग्णांना उपचार कसे मिळतील हा माझा प्रयत्न असेल. माझ्या बरोबरच या हॉस्पिटलमध्ये सर्जरी व जनरल रुग्णांवर तज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत.

या नंतर प्रसिद्ध डाॅ.प्रदीप तुपेरे यांनी जीवन साई हाॅस्पिटल येथे दिनांक शनिवार दि. १८ जुन रोजी मोफत मुळव्याध उपचार शिबिर घेण्यात येणार असून या उद्घाटन प्रसंगी हीच माझी हॉस्पिटल साठी भेट आसणार आहे. तसेच जामखेड सह आष्टी, कडा, व पाटोदा येथील देखील रुग्ण या शिबिरात सहभागी होऊ शकतात.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविक मध्ये डॉ. सादेख पठाण म्हणाले, अहमदनगर येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सारख्या सुविधा जामखेड येथील जीवनसाई हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असणार आहेत. आम्ही कोविड काळात देखील याच ठिकाणी रुग्णांनावर उपचार करुन रुग्ण बरे केले आहेत. यावेळी डॉ. प्रदिप तुपेरे , डॉ. बाळासाहेब देवकर , प्रा. बाळासाहेब पवार यांची भाषणे झाली. याप्रसंगी डॉ. राहुल पंडित , डॉ. प्रदिप तुपेरे, डॉ. बाळासाहेब देवकर, प्रा. बाळासाहेब पवार, डॉ. आर.एम. पवार, डॉ. फारुख आझम , डॉ. शशांक शिंदे , डॉ. प्रशांत गायकवाड ,डाॅ.श्रीकांत सांगळे, डाॅ.मंजुषा देवकर, जीवनसाई हॉस्पिटल चे संचालक डॉ. भरत देवकर , डॉ. सादेख पठाण सह
आदी जामखेड तालुक्यातील डाॅक्टर उपस्थित होते. त्याच बरोबर जामखेड, पाटोदा, आष्टी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, सहकार सोसायटी चे चेअरमन, व्हाईस चेअरमन , संचालक सर्व प्रतिष्ठित व्यापारी नागरिक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here