जामखेड प्रतिनिधी

अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी सीना नदीवर उभारल्या जाणाऱ्या ४ कोटींच्या घाटाचे भुमीपुजन नुकतेच अदितीताई तटकरेंच्या यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच चौंडी येथे सुरु असलेल्या विविध विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही,असा शब्द यावेळी अदिती ताई तटकरे यांनी दिला.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाशेजारील सीना नदी काठावर सुमारे ४ कोटी २० लाख रुपये खर्चून भव्य अश्या नदी घाटाचे निर्माण होणार असून या कामाचे नुकतेच भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते चौंडी येथे गुरुवारी पार पडले.

पर्यटन राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्यासोबत आमदार रोहित पवार, आमदार यशवंत माने, आमदार राजू नवघरे यावेळी चौंडी येथे उपस्थित होते. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन करून अहिल्यादेवी होळकर शिल्पसृष्टीची पाहणी केली. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर स्मारकाशेजारी असलेल्या सीना नदीची पाहणी करून त्यांनी सीना नदीवर उभारण्यात येणाऱ्या नदी घाटाच्या कामाचे भूमिपूजन केले. चौंडी येथे सुरु असलेल्या विविध विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द यावेळी अदिती ताई तटकरे यांनी दिला.

या कार्यक्रमाला माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, मधुकर (आबा) राळेभात, चौंडीच्या सरपंच आशाताई सुनिल उबाळे, सुनील उबाळे, अक्षय शिंदे, सुंदरदास बिरंगळ, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, सहाय्यक अभियंता अमित निमकर , संजय कांबळे, विश्वनाथ राऊत, संतोष निगुडे, तहसीलदार योगेश चंद्रे, तहसीलदार नानासाहेब आगळे, अमर चाऊस, शरद ढवळेसह आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here