कर्जत प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू हे गाव सेवा निवृत्त अधिकाऱ्यांने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण गाव दत्तक घेण्याच जाहीर करताना उर्वरित आयुष्य समाजासाठी व्यतीत करणार असल्याचे सांगितले.

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू या गावांमधील राज्याचे सेल टॅक्स उपायुक्त नागेश जाधव हे कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू या गावचे सुपुत्र आहेत,ते राज्याचे सेल टॅक्स विभागाचे उपायुक्त आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर संपूर्ण गावाने यांचा नागरी सत्कार केला. त्यांची गावांमधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. गावांमध्ये सडा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.ठीक ठिकाणी सुवासिनी त्यांना ओवळत होत्या. आपल्या गावाचा सुपुत्र राज्याची मोठी जबाबदारी पार पाडून पुन्हा आपल्या मातीशी असलेली नाळ घट्ट आहे. यामुळे एक आगळा वेगळा सन्मान निमगाव करांनी केला. संपूर्ण गाव या अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी भारावून गेल्याचे एक आगळे वेगळे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळाले.
यानंतर संपूर्ण गावाच्या वतीने त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर राळेभात होते. यावेळी कैलास शेवाळे, प्रवीण घुले, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, जिल्हा उपनिबंधक सुनील कोठावळे, रवि गायकवाड कमिशनर, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, युवराज गिरी ,सुरेश शिंदे ,सचिन शेंडकर ,बाळासाहेब धस,दादा फाळके, श्री नेरले, हिवरे, काळे हे सर्व नातेवाईक , माजी सरपंच संतोष राजे भोसले, यांच्या सह गावातील अनेक मान्यवर पदाधिकारी महिला, नातेवाईक उपस्थित होते .

या वेळी बोलताना नागेश जाधव म्हणाले की, मी निमगाव डाकु येथील गरीब कुटुंबांमध्ये जन्म घेतला, शिक्षण घेण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते, परंतु मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न होते अनेकांच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले आणि नोकरी मिळाली. नोकरी करताना देखील सामजिक वसा घेतला तो सोडला नाही. अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी यांना मदत केली, अनाथ शाळेला मदत केली आणि आता हाच सामाजिक वारसा पुढे सुरू ठेवणार असून आपल्या जीवनातील उर्वरित आयुष्य हे आपण समाजासाठीच व्यतीत करणार आहोत असे श्री जाधव यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी बोलताना कमिशनर रवि गायकवाड म्हणाले की नागेश जाधव हे अतिशय शांत संयमी आणि गोर गरीब नागरिकांसाठी सातत्याने काहीतरी धडपड करण्याची वृत्ती असलेले अधिकारी होते. अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या सहकार्याने सोबतीने काम केले परंतु कोणत्याही अडचणीच्या आणि संकटाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने एक मित्र म्हणून प्रत्येकाला मदत करणारे अशीच श्री जाधव यांची ओळख आहे.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणाले की, अरे आला का नाही कुमार अतिशय कमी कालावधीमध्ये जरी श्री जाधव यांची ओळख झाली तरी अनेक दिवसांपासून आपला परिचय आहे अशा पद्धतीने सर्वांना आपुलकी आणि प्रेमाने आणि स्नेहा बोलणारी अशी त्यांची ओळख संपूर्ण समाजामध्ये आहे. आज त्यांनी गावांमधील वृक्षारोपण हा उपक्रम पर्यावरणासाठी राबवला आहे याचप्रमाणे व्यायाम शाळा मुलांसाठी तयार केले आहे .
यावेळी मधुकर राळेभात, प्रवीण घुले, कैलास शिवाळे, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, दादा फाळके, संतोष वारे यांच्यासह अनेकांनी बोलताना नागेश जाधव यांच्या विषयी असलेले अनुभव आणि त्यांचे सामाजिक कार्य याबाबत गौरव उद्गार काढले. या सत्काराचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here