जामखेड प्रतिनिधी

अनैतिक संबंधातून झालेल्या खर्डा येथील विशाल सुर्वेच्या खुन प्रकरणी पोलीस तपास करीत आसताना आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व मोटारसायकल हस्तगत करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे.

खर्डा येथील विशाल सुर्वेच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सह त्यांच्या पथकाने अटक केली होती. या आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींनकडे पोलीस तपास करीत आसताना ज्या लोखंडी रॉड ने आरोपींनी विशाल याचा खुन केला होता तो लाखंडी रॉड गोपाळओढा तलावात फेकून दिला होता, गुन्ह्यात वापरलेले हत्यारं शोधण्यासाठी पोलिसांनी संबंधित आरोपींना गोपाळओढा तलाव परिसरात नेले असता, आरोपींनी तलावातून 3 फुट लांबीचा लोखंडी राॅड काढून दिला. पोलिसांनी पंचासमक्ष तो लोखंडी राॅड पंचनामा करत ताब्यात घेतला. विशाल सुर्वेचा खून करण्यासाठी आरोपी ज्या मोटारसायकलवरुन आले होते, ती मोटारसायकल जामखेड पोलिसांनी जप्त केली. पंचासमक्ष त्या मोटारसायकलचा पंचनामा करण्यात आला. रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त विशाल सुर्वेचा खून करणार्या आरोपींनी विशालचा खून केल्यानंतर ज्या भागात रक्ताचे डाग असलेले कपडे फेकून दिले होते ते कपडे, तसेच रक्ताचा डाग असलेला रुमाल पोलिसांना काढून दिले, तसेच मयताचे पाकिट ज्या ठिकाणी जाळले होते ती जागाही पोलिसांना दाखवली.

विशाल सुर्वे खुन प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, हेड काँस्टेबल संजय लाटे , पोलिस नाईट संभाजी शेंडे, पोलिस काँस्टेबल सचिन पिरगळ, संग्राम जाधव, अविनाश ढेरे, संदिप राऊत, अरूण पवार, शशी म्हस्के आणि पंचासमक्ष गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, मोटारसायकल, आणि रक्ताचा डाग असलेला रुमाल, मयताचे पाकिट ज्या ठिकाणी जाळले ते ठिकाण दाखवले यातून आरोपींविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here