जामखेड प्रतिनिधी
खर्डा ते जामखेड पंचायत समिती . मध्ये ॲड अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाज पदयात्रा दि 23 मे रोजी काढणार होते. व मुख्यमंत्र्यांना निरोप देण्याचे काम या पदयात्रेतुन होणार होते.याची दखल घेऊन प्रशासनाने सर्व प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही पुर्ण करुन तात्काळ 10 दिवसात बांधकामास सुरवात करणार असल्याचे गटविकास अधिकारी यांचे पत्र मिळाले.

2015 पासून खर्डा येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मदारी समाजास 20 घरे मंजूर झाली. त्याचा पाठपुरावा लोक अधिकार आंदोलन या संघटनेने केला, पुढे वंचित बहुजन आघाडीने पाठपुरावा चालूच ठेवला. एकूण 5 आंदोलने तहसील व पंचायत समिती तसेच आमदारांच्या कार्यालय समोर केली.पण यश मिळत नव्हते,यामुळे वंचीतने अधिक आक्रमकपणे पुढे येऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याकरिता भर उन्हात मदारी समाजास सोबत घेऊन ॲड .अरुण जाधव यांनी पदयात्रेचे दि 23 रोजी नियोजन केले होते. मात्र या बाबत गटविकास अधिकारी यांनी काम सुरू करण्याबाबत सर्व प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही पूर्ण करुन येत्या दहा दिवसात मदारी वसाहतीचे काम सुरू करण्यात येईल असे लेखी अश्वासन दिले. यास 7 वर्षानंतर यश मिळाले आहे. वंचीत मुळे मदारी समाजास हक्काचे घर मिळणार आहे.
गटविकास अधिकारी यांच्या कडून पत्र स्वीकारताना बापु ओहोळ (लोक अधिकार आंदोलन),आतिष पारवे (वंचीत ता.अध्यक्ष),अजिनाथ शिंदे(वंचीत शहर अध्यक्ष) उपस्थित होते. या वसाहतीसाठी विशाल पवार, द्वारका पवार, हुसेन मदारी, सरदार मदारी, सलीम मदारी गणपत कराळे, नितीन अहेर, दत्तराज पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.





