जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहर व तालुक्यातील गावांमध्ये सामान्य ग्राहकाच्या खिशात हात घालून खाजगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा कट आघाडी सरकार करत आहे. सरकारच्या या स्वार्थीपणामुळे सामान्य वीजग्राहकावर भारनियमनाचे संकट ओढवले असल्याचा घणाघात माजीमंत्री राम शिंदे यांनी खर्डा चौकात राज्यसरकार व महावितरणच्या विरोधात आंदोलन करताना केला.यावेळी महावितरणच्या अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. हे आंदोलन मात्र रात्री ७ वाजता करण्यात आले.

माजी मंत्री राम शिंदे म्हणाले कि, राज्यातील व कर्जत – जामखेडच्या शेतकऱ्यांना शेतीपंप व घरगुती विजेचे भारनियमन मोठ्या प्रमाणात केले जात असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नसून पाणी असून विजे आभावी पिके वाया जात आहेत याची दखल राज्य सरकार व महावितरणने घेण्याची गरज आहे. राज्यसरकारने शिस्तबद्ध पद्धतीने कोळसा टंचाई निर्माण करून दरवाढीच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचे काम केले जात आहे . कोळसा टंचाईमुळे औष्णिक विद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती कमी झाल्याचे कारण पुढे केले जात असले तरी त्यास आघाडी सरकार आणि महानिर्मिती कंपनीचा धोरणशून्य कारभारच जबाबदार असून त्याचा फटका दरवाढीच्या रूपाने सामान्य ग्राहकांवर लादला जात आहे.

भारनियमनामुळे व अनियमित वीजपुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त आहे . वेळेवर व हमीपूर्वक वीजपुरवठा होत नसल्याने शेतातील उन्हाळी पिके पाण्याअभावी करपू लागले आहे . रात्री अपरात्री केव्हाही अनियमितपणे होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी कुटुंबांची झोप उडाली आहे . आता सरसकट भारनियमन लादून सरकारने सामान्य वीजग्राहकाची झोपदेखील उडविली आहे . ग्राहकाच्या हितास प्राधान्य देण्यासाठी स्थापन झालेल्या राज्य वीज नियामक आयोगाने या समस्येत स्वतःहून लक्ष घालून टंचाईबाबत राज्य सरकारला व वीज मंडळास जाब विचारला पाहिजे अशी मागणी यावेळी केली. सर्व मागण्या विचारात घेऊन वेळेवर वीजपुरवठा करण्यात यावा व कुठल्याही प्रकारचे भारनियमनन करता व शेतकऱ्यांच्या दाबाने वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी केली.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, डॉ भगवान मुरुमकर, रवींद्र सुरवसे, कांतीलाल खिंवसरा, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, अनिल लोखंडे, अमित चिंतामणी, अर्जुन दादा म्हेञे शिवकुमार डोंगरे, बापूराव ढवळे, उदयसिंह पवार ,महेश मासाळ, मोहन मामा गडदे, सातव अजय, सोमनाथ राळेभात, बाळासाहेब गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, सुभाष जायभाय, तात्याराम पोकळे, वैजिनाथ पाटील,आभिजीत राळेभात,पांडुरंग उबाळे, अशोक शिंदे, आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here