जामखेड प्रतिनिधी

जामखेडचे सुपुत्र CRPF जवान गणेश कृष्णजी भोसले वय (३८) हे देशसेवेसाठी कार्यरत होते. दि २७ एप्रिल रोजी मध्यरात्री गडचिरोली येथे आपली सेवा बजावत असताना त्यांना वीर मरण आले. त्यांनी देश सेवेसाठी १७ वर्ष जम्मू-काश्मीर, छत्तीसगड ,गुजरात, उत्तराखंड व गडचिरोली अशा विविध भागात सेवा केली आहे. त्यांचेवर जामखेड येथे दि २८ रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

शहीद गणेश कृष्णजी भोसले हे गेल्या १७ वर्षांपासून कमांडीग अॉफीसर म्हणून जम्मू-काश्मीर, छत्तीसगड व गडचिरोली अशा विविध भागात सेवा केली आहे. सध्या ते सहा वर्षापासून गडचिरोली या ठिकाणी डी आय जी अॉफीस मध्ये सेवा बजावत होते. दि २७ रोजी मध्यरात्री च्या सुमारास गणेश भोसले हे आपली सेवा बजावत असताना वीर मरण आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक त्यांचे पार्थिव आणण्यासाठी जामखेड हुन गडचिरोली या ठिकाणी गेले होते.

शहीद गणेश भोसले यांचे पार्थिव आज दि २८ रोजी जामखेड येथे आणण्यात आले. या नंतर त्यांच्या रहात्या घरापासून त्यांची फुलांनी सजवलेल्या रथामधुन शहरातील शिवाजी नगर- पोलीस स्टेशन रोड – खर्डा चौक- तपनेश्वर रोड मार्गे आमरधाम या ठिकाणी अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रा वेळी “अमर रहे अमर रहे गणेश भोसले अमर रहे,” “वीर जवान तुझे सलाम,” “भारतमाता की जय “अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच या वेळी अंत्ययात्रे दरम्यान जागो जागी नागरीकांनी पार्थिवास फुले वाहून श्रध्दांजली वाहीली. आंतयात्रा जात असताना दरम्यान व्यापाऱ्यांनी काही काळ आपली दुकाने बंद ठेवली होती.

सदर पार्थिव जामखेड येथील अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आणला असता नागरिकांनी दर्शन घेतले यानंतर जामखेड पोलीसांनी मानवंदना देऊन बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. तसेच CRPF जवानांनी मानवंदना देऊन बंदुकीतून हवेत तीन वेळा फैरी झाडल्या. यानंतर शहीद जवानांचे भाऊ मयुर भोसले यांनी अग्निडाग दिला. देशभक्ती पर घोषणा देऊन यावेळी अनेकांनी शहीद जवान गणेश भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयातील शिक्षक मयुर भोसले यांचे ते सख्खे बंधु होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here