जामखेड प्रतिनिधी
मुली व महीला या देखील पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून काम करत आहेत. समाज्यात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. मात्र मुलींनी या छेडछाडीला न घाबरता स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत असे मत सभापती राजश्री मोरे यांनी व्यक्त केले.
जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून जामखेड येथे महीला अघाडी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ व सदिच्छा मंडळ जामखेड यांच्या वतीने आदर्श व गुणवंत सन्मान सोहळा शुक्रवार दि ११ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभापती मोरे बोलत होत्या. या दरम्यान जामखेड तालुक्यातील आदर्श माता सन्मान, गुणवंत शिक्षक विद्यार्थी सन्मान, नुतन विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक सन्मान करुन गैरवण्यात आले.
या वेळी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, सभापती राजश्रीताई मोरे, डॉ. शोभाताई आरोळे, उपसभापती मनिषा सुरवसे, माहिला बालकल्याण अधिकारी ज्योती वाल्हेकर, माजी सभापती तथा पं.स.सदस्य डॉ. भगवान मुरुमकर, सुभाष आव्हाड , सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत सर, शिक्षक नेते प्रा. राम निकम, केंद्र प्रमुख मुकूंद सातपूते , माहिला आघाडी अध्यक्ष सौ. कामिनी राजगुरु, अर्चना भोसले, केशवराज कोल्हे, नितीन मोहळकर, संतोष भोंडवे, रजनीकांत साखरे, उपेंद्र आढाव सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सभापती राजश्री मोरे म्हणाल्या की महीला शिक्षकांनी हा कार्यक्रम केला याबद्दल त्यांचे कैतुक आहे. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे तसेच मुलांना देखील मुलींची छेडछाड केल्यावर मुलींना काय त्रास होतो हे समजुन सांगितले पाहिजे त्यामुळे मुले देखील मुलींकडे वाकड्या नजरेने पहाणार नाहीत. महीला दिन एक दिवस साजरा न करता वर्षे भर महीला दिन साजरा केला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून महीलांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. कोरोना काळात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. लवकरच सकाळी शाळा सूरू करण्यासाठी प्रयत्न करु.
शिक्षकांच्या आडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येतो. सर्व संघटना एकत्र येऊन शिक्षकांचे प्रश्न सोडविले जातात. कोरोना काळात देखील दोन वर्षे शिक्षकांनी चांगल्या प्रकारची सेवा केली आहे. पुर्ण वेळ शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात शाळेत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद च्या शाळा ह्या सकाळी कराव्यात अशी मागणी बोलताना केली राम निकम यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना सदिच्छा मंडळाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती कामिनी राजगुरू म्हणाल्या की आमच्या शिक्षक भगिनींही शौक्षणिक कामाबरोबर समाजिक कामातही पुरूषांन बरोबर महिला भगिनी काम करत आहेत तसेच आमच्या मंडळाने कोरोना काळात आरोळे कोविड सेंटरला लाखो रुपयांची मदत केली त्याच प्रमाणे कोल्हापूर सांगली येथील पुरग्रस्थांना एक हजार शौक्षणिक किटचे वाटप केले
तीस महीन्यात सर्व शिक्षकांनी चांगले शैक्षणिक काम केले. जामखेड तालुक्याची गुणवत्ता टीकुन ठेवली. तसेच आरोळे हॉस्पिटल साठी कोरोना काळात सर्व शिक्षकांनी चांगले काम केले. हे काम माणुसकी चे मुल्य आसे काम होते. असे मत गटशिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केले.
बीड जिल्हा परिषद येथे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना पदोन्नती मिळाली त्या बद्दल त्यांचा व डॉ शोभाताई आरोळे यांनी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे त्यांचा विषेश सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोजकुमार कांबळे व दळवी मॅडम तर अभार तालुका अध्यक्ष बाबासाहेब मोरे यांनी मानले.कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमास सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.