कर्जत प्रतिनिधी
कर्जत नगर पंचायतीच्या आज झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागांवर, काँग्रेस- 3 जागांवर विजयी तर
भाजप ला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
कर्जत मधे राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार आणि भाजपचे माजीमंत्री राम शिंदे यांनी निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केलेली होती. एकूण सतरा जागांपैकी राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने 16 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात होते. यापैकी आज लागलेल्या निकालात आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राष्ट्रवादी ने 12, काँग्रेसने 3 अशा आघाडीने 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवत कर्जत नगर पंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला. तर भाजपला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पुर्वी भाजप कडे आसणारी कर्जत नगरपंचायत ही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. भाजपचे माजी मंत्री राम शिंदेंना या निवडणुकीत धक्का बसला आहे.