जामखेड प्रतिनिधी
वेळोवेळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट यांना शिक्षण विभागाकडुन समाधान कारक उत्तरे मिळाली नाहीत. तसेच गॅस एजन्सी जवळ शाळा आसल्याने या शाळेवर उद्याप कारवाई का करण्यात आली नाही. या मागणीसाठी आज पंचायत समिती समोर जिल्हा अध्यक्ष प्रवीण बोलभट यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे.
स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट यांनी गटविकास अधिकारी प्रकाशजी पोळ यांना अतिधोकादाय ठिकाणी उभारलेली कालिका पोदार इंटरनॅशनल स्कूल यावर कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा मागिल पंधरा दिवसांपुर्वीच दिला होता. या निवेदनात म्हटले होते की सदरील लहान मुलांची शाळा ही लगतच गॅस एजन्सी असल्याने लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. सदरील गॅस एजन्सी व शाळा हे अंतर नियमबाह्य असून सदरील शाळेवर योग्य ती कारवाई करावी. तसेच सदरील शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शिक्षण शुल्क आकारून मोठ्या प्रमाणात पालकांची लूट केली जात आहे. सदरील कारवाई करण्याबाबत मा तहसीलदार साहेबांनी गट शिक्षाधिकारी यांना आदेश देऊनही सदरील प्रकरणात कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. गटशक्षणाधिकारी हे सदरील प्रकरणावर कारवाई का करत नाही यावर बऱ्याचशा शंका उपस्थित होत आहेत. तसेच सदर शाळा जामखेड नगरपरिषद हद्दीत येत आसल्याने अशा धोकादायक शाळेस नगरपरिषदेने परवानगी दिली कशी? तसेच सदील लढा हा न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवणार असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अत्तापर्यंन्त दोन तीन वेळा पत्रव्यवहार करून देखील समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत त्यामुळे अखेर आज १९ जानेवारी रोजी पंचायत समिती समोर अमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत उपोषण सुरू ठेवणार आसल्याचे उपोषणकर्ते प्रविण बोलभट यांनी सांगितले.






