जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार हे लवकरात लवकर कोरोनातुन बरे व्हावेत या अनुषंगाने जामखेड तालुक्यातील जवळा या ठिकाणी जवळेश्वर मंदिरात महाआरती तर जामखेड येथे सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश (दादा) आजबे यांच्यातर्फे ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला.
कर्जत जामखेड चे आमदार तसेच तरूणांच्या गळ्यातील ताईत असणारे आ. रोहित (दादा ) पवार यांची नुकतीच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या अनुषंगाने ते कोरोना आजारातून लवकर बरे व्हावेत व जनतेची सेवा करण्यासाठी सक्रिय व्हावेत म्हणून जवळा ग्रामस्थांच्या वतीने जवळेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात सावळेश्वर समूहाचे अध्यक्ष रमेश दादा आजबे यांनी अभिषेक घातला. व नागेश्वराकडे प्रार्थना केली की रोहित दादांना लवकरात लवकर बरे करुन जनतेची सेवा करण्यासाठी संधी मिळावी असे साकडे घालण्यात आले.
त्यावेळी सावरगावचे माजी सरपंच दादासाहेब ढवळे, विश्वास मजूर संस्थेचे चेअरमन संजय बापु बेरड, धोत्री गावचे युवा उद्योजक घनश्याम अडाले, सचिन खैरे, विनोद डिसले, मैनुद्दीन शेख, पिंटू ईगोले, पप्पु साळुंके उपस्थित होते.
तसेच जामखेड शहरातील दर॔गाह हजरत इमामशहा वली हजरत इमामशहा वली बाबा येथे.कज॔त/जामखेड मतदार संघाचे लाडके आमदार मा.रोहित दादा पवार यांची कोरोना आजारातून प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रार्थना(दुवाँ) करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस-मा.राजेंद्र कोठारी,तालुका अध्यक्ष-मा.दत्तात्रय वारे,सुंदरदास बिरंगळ साहेब,उमर भाई कुरेशी, मा.ग्रा.प.सदस्य इस्माईल भाई सय्यद,शहराध्यक्ष-राजेंद्र गोरे,नगरसेवक अमित जाधव,प्रकाश काळे,धनराज राजगुरु साहेब,संजय विटकर,रतन काळे,नंदु महाराज खराडे हे उपस्थित होते.






