कर्जत प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्ताने रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या माध्यमातून कर्जत येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलींची हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणीचा उपक्रम राबवित मुलींच्या अर्थात सवित्रीच्या लेकींच्या आरोग्याची काळजी घेतली दिवसेंदिवस मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी होत जाणे ही काळजीची बाब आहे याचा विचार करून रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या वेळी समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नामदेव देवा राऊत, रोटरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप काळदाते, रोटरीचे विद्यमान अध्यक्ष रामदास काळदाते, सचिव राजेंद्र जगताप, नितीन देशमुख, विशाल मेहेत्रे, नितीन तोरडमल,राहुल खराडे, संदीप गदादे, सचिन धांडे, उपमन्यू शिंदे ,हे रोटरी सदस्य तसेच भामाआज्जी राऊत, प्रतिभाताई भैलूमे, हर्षदा काळदाते, मंगेश नेवसे अजय खराडे,परशुराम क्षिरसागर , विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेच्या निरक्षीका उषा राऊत होत्या. यावेळी रोटरीचे अध्यक्ष रामदास काळदाते यांनी रोटरीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली, रोटरीच्या माध्यमातून कोरोना काळात राबिवलेल्या उपक्रमांची माहिती देतानाच कोरोना मुळे निधन पावलेल्या कुटुंब प्रमुखामुळे झालेली हानी खूप मोठी आहे तरीही एक मदतीचा हात म्हणून रोटरीने अशा कुटुंबातील सदस्यांना शिलाई मशीन चे वाटप केले
डॉ. संदीप काळदाते यांनी मुलींसाठी हिमोग्लोबिन तपासणी करणे गरजेचे आहे त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा राऊत यांनी शालेय जीवणातीन मुलींचे आरोग्य ही बाब खूप महत्त्वाची असून मुलींनी योग्य आहार व व्यायाम करणे गरजेचे आहे हे सांगितले.
ओम लॅब चे संतोष बालगुडे, सुरवसे लॅबचे परबत सुरवसे ,गणेश लॅबचे सतिष तनपुरे,समर्थ लॅबचे मनोज वाघमारे, गिरी मॅडम यांनी तपासणी साठी सहकार्य करून रोटरीच्या कार्यक्रमास हातभार लावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल ढोकरिकर यांनी व आभार प्रदर्शन उषा काळदाते यांनी मांडले. यावेळी सवितीमाईंच्या वेशभूषे मध्ये अनेक मुली आल्या होत्या. त्यांचीही भाषणे झाली.






