जामखेड प्रतिनिधी

शिक्षकांनी कर्तव्यामधे समरस होऊन काम केल्यास आनंद ही मिळतो आणि आपले शरीर स्वास्थ्य ही चांगले रहाते असे प्रतिपादन शिक्षिका श्रिमती शोभा काटकर (राऊत) यांनी केले.

मातकुळी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत गेल्या २१ वर्षापासून सेवा करत आसलेल्या शिक्षिका श्रीमती शोभा काटकर (राऊत) यांचा नुकताच सेवा पुर्ती कार्यक्रम मातकुळी ता. आष्टी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गटशिक्षणाधिकारी यादव साहेब होते. सेवा निवृत्त झाल्या बद्दल श्रीमती शोभा काटकर(राऊत) यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्या पुढे म्हणाल्या की माझी मातकुळी येथे २१ वर्षे सेवा झाली. या कालावधी मध्ये मी मुलांमध्ये समरस होऊन काम केले. त्यामुळे मला मानसिक समाधान मिळाले. त्याच बरोबर मी दुर्गम अशा अजावर मात केली. शरिर स्वास्थ्य ठिक नसताना ही मी दिर्घ रजा न घेता शाळेत काम केले. त्यामुळे मी माझे आजारपण विसरून जायचे. मुलांमधे रममाण होऊन काम करायचे. सेवा कळात मला शिक्षकांनी व गावकर्‍यांनी खूप सहकार्य केले. त्याबदल मी कृतज्ञता व्यक्त करते. सर्वांचे आभार मानते. मी सेवा निवृत्त जरी झाले असले तरी विना मुल्य शिकविण्यात मला आनंदच होईल. विद्यार्थ्यांनी संकोच न करता काही अडचण आल्यास जरूर मला विचारावे. मी तुम्हाला सहकार्य करील. सेवा काळात माझ्या कडुन कोणाचे मन दुखावले गेले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करते.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. सहकारी शिक्षकांनी आपलया भावना व्यक्त केल्या. श्रीमती काटकर यांचे नाव शोभा आहे. खरोखरच त्या आमच्या शाळेच्या शोभत होत्या. शाळेत कोणत्याही कार्यक्रम असो काटकर मॅडम यांचा हीरहीरीने त्या सहभाग घ्यायच्या. आता आम्हाला त्यांची खूप उणीव भासेल. यानंतर मा.गटशिक्षणाधिकारी यादव साहेब या प्रसंगी म्हणाले की मी अनेक शाळा बघितल्या. अनेक शिक्षकांचा संपर्क आला. परंतु मातकुळी सारखा शिक्षक वृंद मला कोठेच पहावयास मिळाला नाही. या शिक्षकांनी शाळेचे रूपच बदलून टाकले. शिक्षणाच्या बाबतीत ही शाळा उत्कृष्ट आहे याचा मला आनंद होतोच पण त्याच बरोबर अभिमानही वाटतो. श्रीमती काटकर मॅडम यांची ऊनीव जानवेल हे तर नक्कीच आहे. त्यांच्या सेवा पुरती च्या निमित्ताने त्याचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रमाने इतरांनी काम केले पाहिजे. त्यांचा आदर्श ईतर शिक्षकांनाही घेतला पाहिजे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री गणेश निकम यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अशोक पठाडे यांनी केले. या प्रसंगी केंद्रातील सर्व शिक्षक. टाकळसिंग शाळेतील शिक्षक. मातकुळी येथील गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. श्रीमती काटकर या दै. गावकरी चे तालुका प्रतिनिधी श्री दताञय राऊत यांच्या सुविध पत्नी आहेत. यावेळी जामखेड येथील पत्रकार, व्यापारी, व मित्र परीवार उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here