कडा / वार्ताहर
————
पुढील वर्षात शतकपुर्तीकडे यशस्वी वाटचाल करणा-या अमोलक जैन शिक्षण संस्थेचा शैक्षणिक कार्यात गौरवशाली इतिहास आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक बांधवानी
जबाबदारीने अध्यापनाचे कार्य केल्यामुळेच या शिक्षण संस्थेचा नावलौकिक झाला असल्याचे गौरवोदगार संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा यांनी काढले.
कडा येथील अमोलक जैन संस्थेच्या मोतिलाल कोठारी विद्यालयाच्या आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती नंदाताई राऊत यांच्या सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
पुढे बोलताना हेमंत पोखरणा म्हणाले की, वर्षानुवर्षे गुणवत्तेत अग्रेसर असणा-या अमोलक जैन शिक्षण संस्थेची लवकरच शतकपुर्तीकडे यशस्वी वाटचाल होत आहे. ही बाब तुमच्या आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. मुख्याध्यापिका श्रीमती राऊत यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि योगदान महत्वपुर्ण असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी घेतलेले अथक परिश्रम कौतुकास्पद आहेत. तसेच त्यांना मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार हा संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोदगार काढले. कुठल्याही क्षेत्रात मनापासून कर्तृत्व सिध्द केल्याशिवाय माणसाला यशाची प्राप्ती होत नाही. या संस्थेला गौरवशाली इतिहास असून व्यक्तिपेक्षा संस्था महत्वाची आहे. माणसे येतात,जातात. मात्र चांगले कार्य करणारे कामय स्मरणात राहतात. शिक्षकांच्या योगदानामुळेच संस्थेची उज्वल भविष्याकडे यशस्वी वाटचाल होत असल्याचे पोखरणा यांनी म्हटले. तर माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे म्हणाले की, शिक्षकांच्या गुणवत्तेवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता अवलंबून असते. शिक्षण क्षेत्रात अमोलक जैन शिक्षण संस्थेचे योगदान महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांचा सर्वांगिण विकास होण्याची गरज आहे. उत्कृष्ठ शिक्षक, प्रशासक अन् शिक्षकांना प्रोत्साहन देणारे पदाधिकारी लाभल्यामुळेच या अमोलक जैन संस्था शैक्षणिक कार्यात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगीतले.
माजी सभापती रमजान तांबोळी, शंकर देशमुख, अनिल ढोबळे, डाॅ महेंद्र पटवा, शिकारे आदींनी श्रीमती राऊत यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा देत यावेळी गौरवोदगार काढले.
याप्रसंगी संस्थेचे गोकुळदास मेहेर, कांतीलाल चानोदीया, हेमंत पोखरणा, रतिलाल कटारिया, डाॅ उमेश गांधी, योगेश भंडारी, डाॅ महेंद्र अनिल मुथ्था, संजय मेहेर, पटवा, बाबुलाल भंडारी, योगेश चानोदीया यांच्यासह सरपंच दीपाताई ढोबळे, माजी सभापती रमजान तांबोळी, संजय ढोबळे, अनिल ढोबळे, शंकर देशमुख, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, प्राचार्य नंदकुमार राठी, योगेश बाफना, जवाहरलाल भंडारी, महेश जाधव, आजी, माजी मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ पडोळे यांनी केले तर आभार प्रा. चव्हान यांनी मानले.
—–%%——



