जामखेड प्रतिनिधी 

जामखेड येथील एच् यु गुगळे उद्योग समूहाच्यावतीने सखी या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी नवीन वस्त्र दालनांची भेट म्हणून नुकतेच जामखेड तालुक्यातील आरणगाव, डोणगाव, कुसळंब, नान्नज येथे नवीन वस्रदालनचे उद्घाटन एच् . यु. गुगळे उद्योग समूहाचे संचालक दिलीप गुगळे यांच्या पत्नी सुनीता दिलीप गुगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सौ सुनिता गुगळे म्हणाल्या की ग्रामीण भागातील माहिलांच्या हाताल कामातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा एच् . यु. गुगळे उद्योग समूहा चा प्रयत्न आहे. तसेच स्व. हरकचंद गुगळे ( सासरे) यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा आमचा प्रयत्न असून सखी या उपकमातून माहिलांना रोजगार देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या निमंत्रक ललिता अजय खोसे यांनी केले. तर, महिलांसाठी स्वतंत्ररित्या सुरू केलेल्या एच.यु. गुगळे सखी वस्रदालनाच्या उद्घाटन प्रसंगी ऋतुजा खोसे , संगिता बोरा , मंगल निगुडे, अर्चना निगुडे, ज्योती शिंदे, राणी शेख , रजनी जंगम आदी पंचक्रोशतील माहिला उपास्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here