कर्जत प्रतिनिधी 

थेरवडी ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना अर्जुन गोडसे  मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले, त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी ढोल-ताशांचा गजर करत फटाके फोडून व गुलालाची उधळण करत जल्लोष केला . यावेळी उद्योजक दादासाहेब थोरात यांनी हा विजय आमदार रोहित पवार यांच्या प्रेरणेने मिळाला असल्याचे सांगितले.

कर्जत तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये सर्वांचे लक्ष तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या थेरवडी ग्रामपंचायतीकडे लागले होते. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व जय हनुमान ग्राम विकास पॅनलचे नाना अर्जुन गोडसे २४५ मते मिळवून हे विजयी झाले . त्यांनी किरण मधुकर गोडसे यांचा तब्बल ६० मतांनी पराभव केला.
तहसील कार्यालय कर्जत येथे मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर होताच थेरवडी ग्रामस्थांनी या ठिकाणी गर्दी केली आणि प्रचंड जल्लोष केला कर्ज शहरांमधून ढोल-ताशांच्या गजरामध्ये विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उद्योजक दादासाहेब थोरात, नितीन धांडे, वसंत कांबळे, माऊली थोरात ,आजिनाथ गोडसे ,बबन थोरात ,बजरंग गोडसे ,गणपत पाटील ,सोपान थोरात , अंगद गोडसे, मनोज थोरात, थोरात ज्ञानदेव गोडसे बापूसाहेब पोकळे संपत थोरात विकास नवले नामदेव थोरात विनोद थोरात ,हनुमंत थोरात, अशोक थोरात, शहाजी गोडसे, अक्षय गोडसे ,बापू गदादे, रमेश गदादे, भास्कर गदादे, दादा थोरात, संतोष थोरात, बापू गोडसे, अर्जुन गोडसे, भानुदास पोकळे ,हनुमंत पोकळे ,सतीश पोकळे, मंगेश थोरात ,सुनील पोकळे ,राहुल थोरात ,मामू शेठ थोरात ,अनिल थोरात, डॉ गणेश सुरवसे ,धनंजय कांबळे , पो पट कांबळे, सागर पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
यानंतर थेरवडी गावांमध्ये देखील भव्य मिरवणूक काढून जाहीर सभा घेऊन मतदारांचे आभार मानण्यात आले.

आमदार रोहित पवार यांच्या प्रेरणेने विजय
यावेळी बोलताना उद्योजक दादासाहेब थोरात म्हणाले की, या विजयाचे श्रेय आमदार रोहित पवार यांना आहे यांच्या प्रेरणेमुळे हा विजय मिळाला आहे. आमदार रोहित पवार हे खऱ्या अर्थाने युवा पिढीसाठी आयकॉन आहेत. थेरवडी गावातील राजकारणामध्ये आपण कधीही लक्ष दिले नव्हते मात्र आमदार रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार झाले आहेत यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक गावामध्ये शेतकरी युवक महिला यांच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. थेरवडी गावामध्ये देखील आमदार रोहित पवार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिले आहे.
यावेळी सोपानराव थोरात बोलताना म्हणाले की हा विजय साधा व सोपा नाही अनेक वर्षांचा बालेकिल्ला पाडून या ठिकाणी मतदारांच्या मदतीने हा विजय मिळवला याचे श्रेय दादासाहेब थोरात यांना आहे. यावेळी वसंत कांबळे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here