अहमदनगर प्रतिनिधी

जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जांभळी गाव शिवारात एका ऊसाच्या शेतात बनावट दारू निर्मितीच्या ‘कारखान्या’वर प्रशासनाने धाड टाकली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

जांभळी गावच्या शिवारात एका ऊसाच्या शेतात बनावट दारू बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती पाथर्डी पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळाली त्याआधारे पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली असून अद्याप पर्यंत हि कारवाई चालू आहे. पाथर्डी पोलिस ठाणे हद्दीमध्ये जांभळी या गावात उसाच्या शेतामध्ये बनावट दारू तयार करण्याचा छोटा कारखाना होता.सदर कारखान्यावर आज रोजी पाथर्डी पोलीस दलाने यशस्वी कारवाई केली.

संशयित आरोपी विजय बाबुराव आव्हाड यास ताब्यात घेण्यात आले आहे.महसूल विभाग, उत्पादनं शुल्क विभाग आणि पोलीस विभाग पुढील कारवाई करत आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, कौशल्यरामनिरंजन वाघ, पोलीस नाईक अनिल बडे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, राहुल तिकोने, अल्ताफ शेख, महिला पोलीस प्रतिभा नागरे, महसुलचे विजय बेरड, सदानंद बारसे, देविदास पाचगे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी कारवाई यशस्वी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here