जामखेड प्रतिनिधी

केंद्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट या संस्थेच्या संचालकपदी ज्योती क्रांती मल्टिस्टेट संस्थेच्या संचालिका सौ.धनलक्ष्मी आजिनाथ हजारे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्त्तरातून अभिनंदन होत आहे.
ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसा.लि.संस्थेचे चेअरमन अजिनाथ हजारे यांनी जामखेड तालुक्यातील जवळा या ग्रामीण भागात ज्योती क्रांती पतसंस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून रोजगार निर्मिती केली. ग्रामीण भागात सुरू झालेल्या पतसंस्थेने हळुहळु प्रगती करून तालुक्यासह जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यात पतसंस्थेच्या एकुण ४८ शाखा स्थापन करुन त्याला विस्तृत स्वरुप प्राप्त करुन दिले आहे.
ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसा.लि.च्या संचालिका सौ.धनलक्ष्मी हजारे यांचे संस्थेचे चेअरमन अजिनाथ हजारे आणि संचालक मंडळाने अभिनंदन केले. अहमदनगर जिल्हा सी.ए.असो.चे संचालक पवन दरक, अ.भा.मराठी नाटय परिषद, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अमोल खोले, अक्षर विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष बलभीम पठारे यांनी सौ.हजारे यांच्या निवडीबद्द्ल अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here