प्रतिनिधी कर्जत 

कर्जत तालुक्यातील डिकसळ शिवारात एका ओमनी गाडी मध्ये सुमारे पाच किलो७०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात येऊन ओमिनिकारसह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात एकूण ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव कर्जत पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.३० रोजी सायंकाळी बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार ,ओमनी गाडी मध्ये गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली यावरून पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र वाघ या यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार रवींद्र वाघ, वैभव सुपेकर, महादेव कोहक, संतोष फुंदे, जितेंद्र सरोदे यांच्या पथकाने कर्जत ते मिरजगाव रस्त्यावर सापळा लावून मिरजगाव च्या दिशेने येणारी ओमिनी वाहन(एम. एच.४२एएस५६९५) यास थांबून गाडीची झडती घेतली असता यात एका काळे रंगाच्या पिशवीमध्ये साक्षी फिल्म गांजा असलेल्या पुढे मिळून आल्या गाडीमध्ये असलेले दोन्ही संघ त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी कोणाला समाज हेमंत किसन टिळेकर (वय ३६रा. उरळीकांचन जि. पुणे) व संतोष नथू सावळे (वय३१रा. तांबे वस्ती उरुळी कांचन जि. पुणे) असे असल्याचे सांगितले. यावेळी ओमिनी वाहनासह गांज्याच्या मुद्देमालासह वरील दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली. एकाच दिवशी दि. ३० रोजी दुपारी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी श्रीगोंदा पोलीस पथकासह श्रीगोंदा येथील लेखकांच्या शेतीत छापा टाकला यात सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर कर्जत मिरजगाव रस्त्यावर विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांज्या एका वाहनातून जप्त करण्यात आला या दोन्ही कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर चांगला जरब निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here