जामखेड प्रतिनिधी

जामखेड चा भूमिपुत्र व शिऊर येथील रहिवासी पै सौरभ गाडे याची बाळेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मॅट मधुन ७४ कीलो वजनी गटात निवड झाली आहे. त्यामुळे तो येत्या डीसेंबर महीन्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती चे मैदान गाजवणार आहे.

जामखेड तालुक्यातील शिऊर येथील भैरवनाथ तालिम संघ शिऊर या ठिकाणी गेल्या अकरा वर्षांपासून सौरभ हा तालमी मध्ये कुस्तीचे सराव करत आहे. शिऊर येथील शेतकरी मारुती गाडे यांचा तो मुलगा आहे. सौरभ याने इयत्ता सातवी मध्ये असताना शालेय कुस्ती स्पर्धेतही पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता. यानंतर आता सौरभ याची बाळेवाडी (पुणे) येथे मॅट मधुन होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रीगोंदा येथे दि ३१ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धा व निवड चाचणीत सौरभ गाडे याची ७४ किलो वजन गटात विजेतेपद मिळविले आहे. डीसेंबर महीन्यात बाळेवाडी (पुणे) येथे मॅट मधुन होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सौरभ गाडे याची निवड झाली आहे. भैरवनाथ तालिम संघ शिऊर यांच्या तालमीचे अध्यक्ष वस्ताद विठ्ठल देवकाते, उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद, मंगेश दादा आजबे, भाऊसाहेब तनपुरे, मारुती गाडे, पंकज हरपुडे, बाप्पु जरे, श्रीधर मुळे, यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.

जिल्ह्यामधुन सौरभ गाडे याची निवड झाली ही कैतुकास्पद बाब आहे. पुणे येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तो नक्कीच बाजी मारेल असा विश्वास वाटतो. जामखेड तालुक्याचे व जिल्ह्य़ाचे नाव महाराष्ट्रत केरेल असा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांनी बोलताना व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here