जामखेड प्रतिनिधी

पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे पाडळी येथील खैरे वस्ती येथील नदीवरील रस्ता वाहुन गेला होता. हा रस्ता पुर्ण पणे बंद झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर पाडळी येथील सरपंच बाळासाहेब खैरे यांनी स्वखर्चाने ग्रामस्थांच्या मदतीने या रस्त्याचा प्रश्‍न लावला मार्गी लावला.

या वर्षी जामखेड तालुक्यात मोठा पाऊस झाला. त्यामुळे अनेक नद्यांना पुर आला होता. पावसाने अनेक ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत. या मध्ये पाडळी येथे खैरे वस्ती कडे जाणारा रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे वाहुन गेला होता व. त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पाडळी गावचे सरपंच बाळासाहेब खैरे (सरपंच पाडळी), प्रकाश पवार (नाना ), पंडितराव (नाना) पवार, प्रवीण खैरे (ग्रामपंचायत सदस्य ) यांच्या माध्यमातून स्वखर्चाने नागरिकांसाठी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला व काम करत असताना वस्तीवरील नागरिक सहकार्यासाठी तत्पर धावून आले. याप्रसंगी साईनाथ निंबाळकर, एकनाथ खैरे, रावसाहेब बामदळे, अशोक उबाळे, उमेश निंबाळकर, आप्पा पवार, बुवासाहेब खैरे, आकाश खैरे, अशोक खैरे, गणेश उबाळे आदी उपस्थित होते. सर्व नागरिकांमुळे रस्त्याचे काम अतिशय जलद गतीने पूर्ण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here