जामखेड प्रतिनिधी

अढळगाव ते जामखेड हा आरणगाव मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आसलेल्या रस्त्याला नितीन गडकरी यांच्या सहकार्याने दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय वीखे पाटील यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला त्यामुळे नुकतेच आरणगाव चे सरपंच लहु शिंदे व त्यांचे बंधु अंकुश शिंदे व ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला.

आरणगाव येथे नुकतीच नगर दक्षिण चे खासदार डाॅ सुजय (दादा) विखे पाटील व अ. नगर जिल्हा बँकेचे संचालक मा अमोल राळेभात यांनी आरणगाव या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी पाठपुरावा केलेला व खासदार मा डाॅ सुजय दादा विखे पा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडुन मंजुर करुन घेतला. तसेच श्रीगोंदा – आढळगाव- आरणगाव- जामखेड या रस्त्याला तातडीने कोट्यावधी रुपयांचा नीधी देखील आणला त्याबद्दल आरणगाव ग्रामस्त व भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मा लहू शिंदे आरणगाव चे विद्यमान सरपंच अंकुश शिंदे, उपसरपंच आप्पासाहेब राऊत, यांनी सत्कार करुन आभार मानले, त्या प्रसंगी उपस्थित डॉ. सीताराम ससाणे, रमजान शेख ,मा संतोष नन्नवरे,मा मधुकर राऊत ,मा बबन पाटील सोनवणे साहेब,मा सचिन राऊत, बारीकराव नन्नवरे ,मा लक्ष्मन म्हस्के , भिमराव निगुडे, शिंदे मेजर, डॉ रवी ससाणे ,ज्ञानदेव म्हस्के , अनिल निगुडे , रमेश नन्नवरे ,रामा शिंदे , जालिंदर पारे, सह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here