जामखेड प्रतिनिधी

कॉमेरा समोर आम्ही काम करत आसतो तेंव्हा प्रेक्षक समोर नसतात हे जरी खरे असले तरी कलाकार प्रेक्षकांची वाट बघत आसतो कारण कलाकार प्रेक्षकांनशिवाय मोठा होऊ शकत नाही असे मत सिनेअभिनत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केले.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक देवमाने सह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.

जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व युवा नेतृत्व अमित चिंतामणी यांच्या वतीने जामखेड येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त गरबा दांडीया स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सिने अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची उपस्थिती विषेश लक्षवेधी ठरली या वेळी त्या उपस्थित पेक्षकांशी बोलत होत्या.

पुढे बोलताना अभिनेत्री वेंगुर्लेकर म्हणाल्या की सध्या कोरोना काळ आसल्याने अनेक शुटींग नाट्य गृह बंद होते मात्र आता कोरोना संकटावर मात करुन सर्व जण पुन्हा सुखी व आनंदी राहु. कलाकाराला सर्वात महत्त्वाचा समोर आसलेला प्रेक्षक महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही समोर आहत त्यामुळे आज मला खुप आनंद होत आहे. तसेच नगरसेवक अमित चिंतामणी करत आसलेल्या कामांचे कैतुक देखील अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी केले.

या नंतर कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की गेल्या दोन वर्षांत मी माझ्या प्रभागातील विकासकामे पूर्ण केली आहेत. तसेच आनखी प्रभागातील व शहरातील विकास करणार असुन या माध्यमातून महीलांनसाठी एक असे ध्येय व संकल्प करुन महीलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. यानंतर उपस्थित महीला भगीनी व नागरीकांचे अभार देखील अमित चिंतामणी यांनी मानले.

या वेळी पत्रकार धनराज पवार यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या बद्दल कार्यक्रमाचे आयोजक अमित चिंतामणी यांनी पत्रकार धनराज पवार यांचा सन्मान केला.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here