जामखेड प्रतिनिधी

विकासाच्या दृष्टिकोनातून जामखेड हे नगर जिल्ह्याच्या नकाशापासून दूर होते. या दुर आसलेल्या जामखेड तालुक्याला नगर जिल्ह्याच्या विकास आराखड्यात आणुन जामखेड चा विकास कोणी केला आसेल असेल तर तो राम शिंदे यांनीच केला आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी जामखेड येथे केले.

जामखेड येथे तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शासकीय अधिकारी व ग्रामस्थांसमवेत आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. विखे म्हणाले, कुणी म्हणत असेल की जामखेड – सौताडा राष्ट्रीय महामार्ग (५४८ डी) आम्ही केला, पण मला श्रेयवादाच्या लढाईत उतरायचे नाही. यावेळी त्यांनी इतर रस्त्यांचाही उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप वर दाखवलेल्या विश्वासाबाबत आभार मानले. राम शिंदे यांनीही त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी जामखेड – सौताडा या मार्गाची पाहणी अधिकाऱ्यासमवेत केली.

याप्रसंगी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मुख्याध्याकारी मिनिनाथ दंडवते, सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता पालवे, संजय कांबळे, जिल्हा परिषद सद्स्य सोमनाथ पाचारणे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, अँड. प्रविण सानप, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, संचालक मकरंद काशिद, नगरसेवक अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, संजय राऊत, मनोज कुलकर्णी, अर्जुन म्हेत्रे, डॉ. अल्ताब शेख, प्रविण चोरडिया, मा. उपसरपंच सुरेश जाधव, अभिजीत राळेभात, शिवकुमार डोंगरे, युवा नेते मोहन देवकाते, डॉ. महेश मासाळ, विक्रांत घायतडक, अरूण म्हस्के, प्रा. अरुण वराट, प्रसिद्धी प्रमुख उध्दव हुलगुंडे, आप्पा ढगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here