जामखेड प्रतिनिधी

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे व या कोविड साथरोगाच्या काळात शिक्षण क्षेत्राचा गुणात्मक विकास साधायचा असेल तर प्रत्येक शिक्षकाने नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी असा सल्ला जागतिक बँकेचे शैक्षणिक सल्लागार , जागतिक कीर्तीचे शिक्षक तथा 7 कोटींचा ग्लोबल टीचर्स पुरस्कार मिळविणारे भारतातील पाहिले शिक्षक श्री रणजीतसिंह डिसले यांनी दिला.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांचे तंत्रस्नेही सहकारी मित्र राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या थिंक टॅंक ( सल्लागार) मंडळाचे सदस्य तथा NCERT नवी दिल्लीचे राष्ट्रीय मार्गदर्शक श्री रवी भापकर सर यांच्या जामखेड स्थित निवासस्थानी त्यांनी कौटुंबिक सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते.
यावेळी जामखेड पं. स. चे गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ , महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेल्हेकर यांनी तालुक्याच्या वतीने श्री डिसले यांचा सत्कार केला. श्री पोळ यांनी त्यांचेशी शैक्षणिक बाबींवर सखोल चर्चा केली.व जामखेड तालुक्यातील शैक्षणिक विकासाबाबत सरांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. श्री पोळ यांच्या शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या आवडीबद्दल सरांनी समाधान व्यक्त केले.
शिक्षकांच्या वतीने जामखेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नारायण राऊत यांनी डिसले सरांचा यथोचित सन्मान केला .यावेळी आदर्श शिक्षक श्री दादा चव्हाण , केशव कोल्हे, अर्जुन घोलप, नवनाथ बहीर, ज्ञानदेव कोळेकर,किरण गोरे,नितीन जाधव, ग्रामविकास अधिकारी युवराज ढेरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here