जामखेड प्रतिनिधी

संबंध महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू आणि पंढरपूर कैकाडी मठाचे मठाधिपती ह.भ.प. रामदास महाराज कैकाडी यांची काल प्रथम पुण्यतिथी निमित्त जामखेड मधील कैकाडी समाज बांधवांनी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले .

राष्ट्रसंत कैकाडी बाबांचे पुतणे व गाडगे महाराजांच्या विचारांचे अनुयायी आणि एक परखड प्रबोधन कार म्हणून रामदास महाराजांचा लौकीक संबंध महाराष्ट्र भर आहे. रामदास महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यासाठी प्रभाग ९ चे नगरसेवक मोहन वस्ताद पवार, शिक्षक समिती तालुकाप्रमुख विजयकुमार जाधव सर,कुंडलतात्या राळेभात, शिक्षक समिती जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव पवार, जामखेड कैकाडी समाज तालुकाध्यक्ष आजीनाथ जाधव, टायगर ग्रुप तालुकाप्रमुख देवा (काळू)जाधव, अशोकमामा माने ,रमेश गायकवाड, सोपान जाधव, दादा जाधव,रवी जाधव, दिपक गायकवाड, राम माने, कृष्णा, विजय, गोकुळ माने,मारुतीआप्पा माने, सुरज जाधव,अजय माने, अशोक माने , रोहीत माने, रवी माने, गोपीनाथ जाधव, बाळू, लखन, विजय, संजय, सोमनाथ, मारुती,अक्षय, नागेश, रघू, विशाल जाधव सह अनेक महीला भगिणी यावेळी अभिवादनासाठी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here