जामखेड प्रतिनिधी : १८ आॅक्टोबर
जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व युवा नेतृत्व अमित चिंतामणी यांच्या वतीने उद्या दि. १९ रोजी जामखेड येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त ओपन गरबा दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सिने अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर या उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजक अमित चिंतामणी हे विविध सण उत्सवांच्या निमित्ताने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात. त्या अंतर्गतच गेली अनेक वर्षांपासून ते कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबवित असतात. त्यानुसारच याही वर्षी ओपण गरबा दांडीया स्पर्धेचे आयोजन केले असून यामध्ये उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट जोडी व उत्कृष्ट दांडीया क्वीन अशी विविध बक्षीस ठेवण्यात आली आहेत.
जामखेड शहरातील महावीर भवन, नगर रोड जामखेड येथे आज दि. १९ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अमित चिंतामणी यांनी केले आहे.






