जामखेड प्रतिनिधी

लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ जामखेड येथे महाविकास आघाडी च्या वतीने राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांच्या कडुन लखीमपुर येथील घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शहरातील खर्डा चौकात तहसीलदार यांना निवेदन दिले.

उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकर्‍यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ जामखेड मध्ये बंदची हाक दिली होती. या वेळी शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली वाहून आरोपींना अटक व्हावी व संबंधित केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा या मागणीचे व निषेधाचे निवेदन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्र यांना देण्यात आले.

यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात म्हणाले की, ज्याप्रमाणे इंग्रजांच्या विरोधात लढा देणाऱ्या तसेच स्वातंत्र्यच्या लढाईमध्ये चौकात उभे राहून छातीवर बंदुकीच्या भारतीय शिपायांनी गोळ्या झेलल्या ती वेळ आलेली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथील घटनेत ज्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्याने शेतकऱ्यांच्या मोर्चात गाडी घालून 9 जण मारले व 50 जण जखमी केले या निषेधार्थ महाराष्ट्र बंद आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले, येथून पुढे शेतकरी रस्त्यावर आला, तरच त्याला न्याय मिळेल अन्यथा न्याय मिळणार नाही. जसे की जलियनवाला बाग हत्याकांडाचे जनरल डायरने हत्याकांड घडून आले त्याचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला किती लोक आहेत यापेक्षा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे तसेच हे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.

यावेळी कर्जत – जामखेड विधानसभा प्रमुख क्षेत्र मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सरपंच सुनिल कोठारी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, इस्माईल सय्यद, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, ज्येष्ठ नेते वैजनाथ पोले, नगरसेवक पवन राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, सरपंच बापु कार्ले , उपसरपंच नागेश कात्रजकर,प्रकाश काळे, उमर कुरेशी, अमित जाधव, युवक काँग्रेसचे राहुल उगले, युवा नेते राहुल आहिरे सर, प्रवीण उगले, महेंद्र राळेभात, महेश राळेभात, सचिन शिंदे,रोहन पवार,जमीर बारुद,जुबेर शेख, हरिभाऊ आजबे, समीर चंदन , सुनिल जगताप, काकासाहेब कोल्हे,देवीदास भादलकर, शिवराजे घुमरे, सुनिल शिंदे, अनिकेत जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here