जामखेड प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत मंगळवार दि. १२ रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन व वसाहत परिसराची स्वच्छता केली.

सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडील निर्देशन्वये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे निमित्ताने अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे आयोजन 15 ऑगस्ट 2022 पर्यंत करायचे आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक
12 रोजी सकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत जामखेड पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेत 3 अधिकारी, 15 पोलीस अंमलदार , 4 होमगार्ड असे हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here