जामखेड प्रतिनिधी

केवळ गोल्ड मिडल मिळेले म्हणजे आपण खुप मोठे झालो आसे समजू नका. या आगोदर काही सकारात्मक काम करून चांगली व्यक्ती बना. कारण सकारात्मक गोष्टींमध्ये यश लपलेलं आसत

अ.नगर जिल्हा वुशु संघटना व जामखेड पोलीस स्टेशन जामखेडच्या वतीने राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आयडियल स्पोर्टस् अकॅडमी जामखेडच्या खेळाडूंचा पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या वेळी ते बोलत होते.

वर्धा येथे नुकत्याच राज्यस्तरीय वुशु अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आयडियल स्पोर्टस् अकॅडमी जामखेडचे खेळाडू रोहित थोरात व यश जाधव यांनी सुवर्णपदक मिळविले. त्यांची जालिंदर पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच कृष्ण वणवे, संदीप जायभाय, आदित्य जायभाय यांनी कांस्यपदक मिळविले आहे. या कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, अकॅडमीचे अध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात, अ.नगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले, उपाध्यक्ष प्रशिक्षक शाम पंडित, खेळाडू व पालक इ.मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here