जामखेड प्रतिनिधी, दि ९
घर बांधण्यासाठी व पोल्ट्री शेड चा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन एकूण पाच लाख रुपये घेऊन ये असे बोलून विवाहितेचा गेल्या सात वर्षांपासून छळ केला जात होता. अखेर या छळास कंटाळून विवाहितेने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सासरकडील एकुण नऊ जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी की पिडीत विवाहित महीला मुळ रा. बेलवंडी स्टेशन. ता श्रीगोंदा (हल्ली रा. हळगाव ता. जामखेड) ही २०१३ रोजी लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी बेलवंडी स्टेशन ता. श्रीगोंदा या ठीकाणी रहात होती. या नंतर तीचा सासरकडील पती सतिश महादु लाढाणे, दिर अनिल महादु लाढाणे, सासरे महादु किसन लाढाणे, सासु हैसाबाई महादु लाढाणे, उषा अनिल लाढाणे, किसन बाळु लाढाणे, व आनखी एक , सर्व.रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा व चांगुणाबाई बबन कापसे, बबन बापु कापसे दोघे रा. हळगाव ता. जामखेड यांनी फिर्याद विवाहितेस सासरी नांदत आसताना म्हणत होते की तुला नांदायचे आसेल तर घर बांधण्यासाठी माहेरुन तीन लाख व पोल्ट्री शेडचा हप्ता फेडण्यासाठी दोन लाख असे एकुण पाच लाख रुपये घेऊन. तसेच तीचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. अखेर पिडीत विवाहित महीलेने या छळास कंटाळून जामखेड पोलीस स्टेशनला दि ७ अॉक्टोबर रोजी दाखल केलेल्या फीर्यादी वरुन सासरकडील एकुण नऊ जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. साठे हे करत आहेत.