जामखेड प्रतिनिधी
शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहार साहीत्य ठेवलेल्या स्वयपाक खोलीचे चोरट्याने कुलुप तोडून पोषण अहाराचे साहीत्य चोरुन नेले होते. मात्र जामखेड पोलीसांनी तपास करीत आरोपीस जेरबंद करुन त्यांच्या कडुन काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, जामखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले-मुली) सेमी इंग्लिश येथील शालेय पोषण आहाराचे साहित्य, यामध्ये भांडे व इतर साहित्य असे ६२५० रूपये किमतीचे साहित्य दि.८ जूलै रात्री १ ते ९ जूलै सकाळी १० वाजेच्या दरम्यान चोरीस गेल्याची घटना घडली. या बाबत शाळेचे मुख्याध्यापक गणपत चव्हाण यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत यातील संशयित आरोपी चंद्रकात भागुजी काळे यास अटक केली. व सदर चोरीला गेलेले साहित्यही हस्तगत करण्यात यश मिळविले. सदर संशयित आरोपीस न्यायालयाने १२ जूलै पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.
या घटनेत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिवाजी बोस, काॅन्स्टेबल राहुल हिंगसे व मुक्तार कुरेशी यांनी चोख कामगिरी बजावली.