जामखेड प्रतिनिधी

जवळा जिल्हा परिषद गटा मधील भारतीय जनता पार्टी जामखेड चे भाजपा चिटणीस प्रशांत शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची सरचिटणीस पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आसल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून वारंवार पक्षाच्या धेय धोरणा विरोधात काम केले आहे. बर्‍याच वेळा समज देऊनही त्यांच्या मध्ये कसलाही बदल होत नाही. त्यामुळे जवळा जिल्हा परिषद गटा मधील भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस प्रशांत शिंदे यांची नुकतीच पक्षाने हाकलपट्टी केली आहे. या बाबत भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आसल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रशांत शिंदे हे जवळा परिसरातील राजकारणात सक्रिय आसल्याने त्यांची मोठी ओळख आहे. त्यांची भावजय वैैैशाली सुभाष शिंंदे ह्या जवळा गावच्या सरपंच आहेत. प्रशांत शिंदे हे राष्ट्रवादी च्या वाटेवर आसल्याची जोरदार चर्चा सुरू होती मात्र त्या आगोदरच भाजपने कारवाई केली आसल्याचे बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here