Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण ताकदीने रामभाऊंच्या पाठीशी उभा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण ताकदीने रामभाऊंच्या पाठीशी उभा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण ताकदीने रामभाऊंच्या पाठीशी उभा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जामखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर संपन्न

जामखेड प्रतिनिधी

“सभापती राम शिंदे आमचे हेडमास्तर आहेत. त्यांनी सांगितलेली प्रत्येक कामे पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. जामखेडचे एकही काम अपूर्ण राहणार नाही, याची मी मुख्यमंत्री म्हणून पूर्ण शाश्वती देतो.”मुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण ताकदीने रामभाऊंच्या पाठीशी उभा आहे असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील सभेत व्यक्त केला.


जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्ष पदाच्या भाजपा अधिकृत उमेदवार सौ. प्रांजल अमित चिंतामणी तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ जामखेड येथे भव्य जाहीर सभा घेतली. या सभेला आमदार सुरेश धस, आमदार योगेश टिळेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलतांना म्हणाले की “विधानसभेत जामखेडने भक्कम किल्ला जिंकला होता, पोस्टल बॅलेटमधील पडझड आता भरून काढायची आहे. प्रांजल ताईंना विजयी करा, नगरपालिका रामभाऊंच्या नेतृत्वाखाली द्या. मुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण ताकदीने रामभाऊंच्या पाठीशी उभा आहे — हा माझा शब्द.”

या सभेला महिलांची मोठी उपस्थिती, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि घोषणांचा गगनभेदी आवाज यामुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पातळीवर ही सभा जामखेडच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

भाजपाने या निवडणुकीत स्थैर्य, प्रामाणिकता आणि विकासाचा ध्यास पुढे ठेवत कमळ चिन्हा समोरील बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. सभेतील उत्स्फूर्त वातावरण आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला स्पष्ट शब्द यामुळे भाजपाच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी यावेळी शहरातील सर्व बेघर लोकांना हक्काचे घरे, शहरातील संपूर्ण रस्ते सिमेंट कॉंक्रेट, मंजूर असलेली सुधारित पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करावी जामखेड नगरपरिषद हद्दीत 7 वाड्या वस्ती आहेत तेथील शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशा जलसंधारणाच्या योजना सुरू करण्यात याव्यात या मागण्या केल्या.

आमदार सुरेश धस आपल्या भाषणात म्हणाले सभापती हे पद खूप मोठे आहे त्यापदाचा मुख्यमंत्री देखील मान ठेवतात राम शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका होवू शकते परंतु विधानपरिषद सभापती या पदाचा एखादा अवमान करत असेल तर त्या व्यासपीठावर उपस्थित जबाबदार लोकप्रतिनिधींनी त्यांना थांबवणे गरजेचे होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!