

जामखेडला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला शिवसेना उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन केला निषेध….
शेतीमालाला भाव व जामखेडची एमआयडी आवडणार्या भाजप सरकारचा केला निषेध
जामखेड प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्या समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांन कडुन जामखेड एमआयडीसी अडविणाऱ्यांचा निषेध, शेतकरी कर्जमाफी व कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी घोषणाबाजी केली. तसेच भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी अचानक घडलेल्या घटनेमुळे जामखेड करांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यामुळे प्रशासनाने शिवसेना पदाधिकारी यांना ताब्यात घेतले.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड रोडने कडेकोट बंदोबस्त येत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आणि एमआयडीसी अडविणाऱ्यांचा निषेध करण्यात आला तसे फलक फडकाविला याचबरोबर शेतकरी कर्जमाफी करावी, कांद्याला हमीभाव मिळावा अशी घोषणाबाजी केली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ॲड मयुर डोके, शिवसेना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख गणेश उगले, नितीन ससाने, संतोष शिंदे, संदीप उगले, संयोग सोनवणे याबरोबरच आणखी काही शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. अचानक सुरू झालेली घोषणाबाजी पाहून प्रशासनाची एकच धावपळ उडाली यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी यांना प्रशासनाने ताब्यात घेतले. जामखेड कर्जत मध्ये एमआयडीसी साठी आमदार रोहित पवार व सभापती प्रा राम शिंदे यांच्या वादात एमआयडीसी अडकली आहे. मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तरुण मतदारसंघात आहेत यांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे.

महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण अद्याप कर्जमाफी दिली नाही कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. यामुळे कर्जमाफी मिळावी व कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. याचीच चर्चा शहरात रंगली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.




