

प्रभाग दोन (अ) चे भाजपाचे ॲड. प्रविण सानप यांचा होम टु होम प्रचार
मंगळवार दि 2 रोजीच प्रभाग 2 (अ) चे उमेदवार ॲड. प्रविण सानप यांच्या प्रभागाचे देखील होणार मतदान
जामखेड प्रतिनिधी
नगरपरिषदेची जशी तारीख जवळ येऊ लागली आहे तशी प्रचार देखील जोर धरु लागला आहे. प्रत्येक उमेदवार घराघरात पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने प्रभाग दोन (अ) चे भाजपचे ॲड. प्रविण सानप यांचे मंगळवार दि 2 रोजीच प्रभाग 2 (अ) चे उमेदवार ॲड. प्रविण सानप यांच्या प्रभागाचे देखील होणार मतदान होणार असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका असे देखील ॲड प्रविण सानप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ॲड. प्रविण सानप यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे व सामाजिक कामाच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक दोन (अ) मध्ये भाजप कडुन ॲड प्रविण सानप हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नुकताच सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यानंतर सभापती प्रा.राम शिंदे व त्यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे यांच्या देखील प्रभागात प्रचार सभा झाल्या आहेत. भाजपाचे व सभापती प्रा राम शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अँड प्रविण सानप हे कोणत्याही पदावर नसताना गेल्या नऊ वर्षापासून अखंडपणे अहोरात्र जनसेवेत आहेत. “हॅलो म्हटले की आलोच ” मग कोणतीही अडचण असो, प्रभागात पदरमोड करून मुरमीकरण, लाईट, रस्ते, गटार ही कामे मार्गी लावली. प्रभागातील जनतेसाठी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन, न्यायालयीन कामकाज करताना मोफत केले. धोत्री शिवाजीनगर, संताजीनगर, मोरे वस्ती, राळेभात वस्ती येथे पदरमोड करून मुरमीकरण केले.

न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग 2 (ब) च्या सर्वसाधारण महीला उमेदवारांच्या मतदानाची तारीख ही 20 डीसेंबर 2025 रोजी आहे मात्र प्रभाग दोन (अ) चे भाजपाचे उमेदवार ॲड. प्रविण सानप यांचा होम टु होम प्रचार सुरू आसुन मंगळवार दि 2 रोजीच प्रभाग 2 (अ) चे उमेदवार ॲड. प्रविण सानप यांच्या प्रभागाचे देखील मतदान होणार आहे. तसेच नगराध्यक्षा पदासाठी भाजपच्या प्रांजलताई अमिंत चिंतामणी यांचा अनुक्रमांक 2 आसुन प्रभाग दोन (अ) चे उमेदवार ॲड. प्रविण सानप यांचा अनुक्रमांक 4 आहे.




