

नगराध्यक्षापदाचे उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांच्या प्रचार दौऱ्यास नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापले असून, या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून सभापती प्रा राम शिंदे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. भाजपाची प्रचाराची धुरा हातात घेतलेल्या सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्षापदाचे उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांच्या प्रचार दौऱ्यास नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. प्रचाराने संपूर्ण शहरात भाजपच्या उमेदवारांच्या ‘विजयी लाटेचा’ संदेश दिला असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढली आहे.

नगराध्यक्षापदाचे उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी या १२ प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जात त्यांच्या घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत त्या त्या प्रभागातील उमेदवारांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच प्रभागाबद्दलचे असलेले विकासाचे स्वप्न त्यांच्यापुढे मांडण्यात आले. त्यामुळे एक विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला.यावेळी प्रर्भागात असणाऱ्या लहान मोठ्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठीचे व्हिजन सौ.प्रांजल अमित चिंतामणी यांनी नागरिकांसमोर मांडले. अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते प्रश्न मार्गी लावणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे अशी ठोस आश्वासने देण्यात येत आहेत.
शहरातील सर्व प्रभागाचा विकास नियोजनबद्धरित्या करण्यासाठीचा विश्वास व्यक्त केला.शहरातील कचऱ्याची समस्या, सार्वजनिक शौचालयाची समस्या, रस्ते समस्या सोडविण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार असल्याचे, प्रांजल अमित चिंतामणी यांच्याकडून सांगण्यात आले.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
प्रांजल चिंतामणी यांना नारीशक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विकासाभिमुख,कार्यक्षम,दूरदृष्टी नेतृव असलेल्या नगराध्यक्षापदाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी याना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या पारदर्शक प्रतिमेमुळे, विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे अनेक नागरिक त्यांच्याबरोबर उभे राहत आहेत. विविध भागांत काढण्यात येणाऱ्या प्रचार रॅलींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती जाणवते.नारीशक्तीचा उत्स्फूर्त सहभागामुळे प्रचाराचा वेग आणखी वाढला असून भाजपच्या उमेदवारांच्या विजयाच्या आशा अधिक दृढ होताना दिसत आहेत.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अमित चिंतामणी प्रामाणिक नेतृत्व, स्वच्छ प्रतिमा आणि निश्चयी कार्यशैली
कामाला प्राधान्य देणारा, लोकांशी जवळीक राखणारा आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करणारे असे अमित भाऊंचा स्वभाव आज जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेला आहे.मागील निवडणुकीत त्यांनी ‘नगरसेवक काम केला आहे प्रभागात उत्कृष्ट पद्धतीने विकास कामे केली आहे नगरपरिषदेचा चांगला अनुभव असल्याने ‘ शहरात त्यांच्या प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेमुळे युवकांमध्येही नवीन उर्जा निर्माण झाली आहे.याचा फायदा शहरातील भाजपच्या सर्व उमेदवारांना होणार आहे.







