

दोन्ही आमदार मोठे लोक आहेत. सभापती प्रा. राम शिंदे सत्तेतील मोठ्या पदावर कार्यरत आहेत मग जामखेला त्यांचे कोणते विकासकामं चालू आहेत. जामखेडची अत्यंत खराब अवेस्था या दोन आमदारांमुळेच झाली आहे. विकास नाही फक्त एकमेकांचे उणेदुणी काढण्यात वेळ घालवला. दोन्ही आमदारांचे राज्यात मोठे नाव मात्र जामखेडचा विकास खुटलेलाच आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात होती. पुढे बोलतांना महेश निमोणकर म्हणाले की, राजकारण समाजकारण करताना कसलाही डाग लागु दिला नाही. समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना संकटकाळी व अडीअडचणीत अहोरात्र मदतीसाठी उपलब्ध राहिलो आहे. आमच्या समोर धनदांडगे मोठ लोक उभे आहेत मात्र जनता आमच्या बरोबर आहेत. आम्ही तळमळीने काम करत आलो आहोत. जनतेला हे माहिती आहे.
जनतेवर आमचा विश्वास आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदेर्शनाखाली आम्ही जामखेडचा विकास करून जनतेला मुलुभूत सुविधा देण्यासाठी व स्वच्छ सुंदरं ठेवण्यासाठी, जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी नगरपरिषदचे स्वतंत्र दवाखाना करून शहराच्या सर्वागिण विकासासाठी आम्ही निवडणुकीला उभे आहोत. जातीपातीचे राजकारण न करता आपल्या कामाचा माणुस म्हणुन आमच्याकड़े पहा असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित परवार यांच्या लाडक्या बहिणी म्हणजे महिला भगिनीचा आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महेश निमोणकर हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आहे. शहराच्या विकासाचा ध्यास घेतला आहे, आपल्या कामाचा माणुस म्हणुन बघा कोणाच्याही आमिषाला प्रलोभनाला बळी पडू नका व मत घड्याळाला द्या. नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा महेश निमोणकर व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडुन जामंखेडचा विकास करून घेण्याची जबाबदारी आमची राहील असे आश्वासन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जामखेड शहरातील जनतेला संध्याताई सोनवणे यांनी दिले.








