

निवडणूक आली की विकासाच्या गप्पा मारणाऱ्या दोन्ही आमदारांना धडा शिकवा – आ. सुनिल शेळके
जामखेड प्रतिनिधी
भाजप व राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांची दोन टर्म झाली आहे पण शहराला आठ दिवसाआड पाणी, रस्त्याचे अर्धवट कामे व धुळीने माखलेले शहर, औद्योगिक वसाहतीला खोडा व श्रेयवादाची लढाई करायची अशी परस्थिती असताना निवडणूक आली की दोन्ही आमदार तळ ठोकून ठोकून बसतात व विकासाच्या गप्पा मारतात तसेच मताचा रेट पाच हजार करतात ते लक्ष्मी घेऊन आली की ते घ्या पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना विजयी करून त्या दोघांना धडा शिकवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) स्टार प्रचारक सुनिल आण्णा शेळके यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत केले.

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत स्टार प्रचारक सुनिल आण्णा शेळके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, प्रदेश युवती अध्यक्ष संध्या सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाउपाध्यक्ष बापूराव शिंदे, युवा नेते अक्षय शिंदे, कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सुरज रसाळ, नगराध्यक्ष उमेदवार सुवर्णा निमोणकर, नगरसेवक पदाचे उमेदवार सारिका डोळे, सुरज निमोणकर, द्वारका पवार, पूजा शिंदे, नजमा सय्यद, मिठूलाल नवलाखा, गणेश काळे, मुक्ता म्हेत्रे, शेख सलाउद्दीन, ताहेरा शेख, महेश निमोणकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. सुनिल आण्णा शेळके म्हणाले, नगरपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, आ. रोहीत पवार यांनी सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती महेश निमोणकर यांना घेरण्याचे काम करत आहेत. पण आ. सुनिल शेळके तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी भक्कम पणे उभा आहे. मला ही मावळमध्ये असेच घेरले होते व सर्व सत्ता त्यांच्या बाजुने होती पण माझ्या माघे उपमुख्यमंत्री अजितदादा दुरदृष्टी असलेले नेते आहेत. तुम्ही त्यांना निवडून द्या अजितदादा या शहराचा चेहरामोहरा बदलून टाकतील.

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे म्हणाले, दोन आमदार असून जामखेड भकास आहे. निवडणूक आली की जनतेने मागितले आरबी समुद्र द्या, आकाशातील तारे द्या म्हटले की लगेच देतात. त्यामुळे अशा भुलभुलैय्या दोन्ही आमदार जनतेची दिशाभूल करतात. माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात सत्ता आली तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा मोठ्या प्रमाणावर निधी देऊन विकासाची गंगा आणतील. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुवर्णा निमोणकर व त्यांच्या अकरा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर म्हणाले, कोरोना काळात एका आमदाराने टॅंंकरने लावलेले पाणी बंद केले तर दुसरा घरासमोरील झाडांना पाणी देत होतो हे सर्व जनतेने पाहीतले. आम्ही दोनशे युवकांची टिम घेऊन जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली तसेच टॅंंकरने पाणीपुरवठा केला. कोणताही जातधर्म न पाहता लोकांनी हाक मारली की अर्ध्या रात्री हजर असतो. त्यामुळे जनतेने विचार करून कामाच्या लोकांना निवडून द्या असे आवाहन केले. यावेळी संध्या सोनवणे, बाळासाहेब शिंदे, बापूराव ढवळे, राजु शिंदे, मिठूलाल नवलाखा यांनी मार्गदर्शन केले. संतोष मोहळकर यांनी आभार मानले. हनुमंत महाराज निकम यांनी सुत्रसंचलन तर संतोष मोहळकर यांनी आभार मानले.





