

आरोप सिद्ध करा अन्यथा आ रोहित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा – विकास राळेभात
अपक्ष उमेदवार नितुशा सदाफुले यांनी नगराध्यक्षांसाठी उभ्या आसलेल्या प्रिती विकास राळेभात यांना दिला जाहीर पाठींबा.
जामखेड प्रतिनिधी
आ. रोहित पवार यांनी काल केलेल्या आरोपांच माजी नगराध्यक्षा प्रिती राळेभात यांनी खंडण केले असुन अर्ज काढून घेण्यासाठी पैसे घेतले असल्याचा आरोप आ. रोहित पवार यांनी केला. सदरील आरोप आ. रोहित पवार यांनी सिद्ध करुन दाखवावे आम्ही राजकारण सोडू अन्यथा रोहित पवार आमदारकीचा राजीनामा द्यावा असे आवाहन विकास राळेभात यांनी केला.

माजी प्रथम नगराध्यक्षा प्रिती विकास राळेभात यांच्या कडुन पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी रुपाली राळेभात उपस्थित होते. अपक्ष उमेदवार नितुशा सदाफुले यांनी नगराध्यक्षांसाठी प्रिती विकास राळेभात यांना पाठींबा जाहीर केला,
यावेळी बोलताना प्रिती विकास राळेभात म्हणाल्या कि आम्ही जेव्हां 2016 साली नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आम्ही पक्षाकडे मागणी केली तेव्हाही तिकीट दिले नव्हते. आम्ही जनतेच्या स्वबळावर निवडणूक लढवली आम्ही निवडून आलो होतो. त्यानंतर नगराध्यक्षपदासासाठी भाजपकडून ऑफर आली होती मात्र आम्ही राष्ट्रवादीशी एकनिष्ठपणा ठेवत सत्ता राष्ट्रवादीकडे दिली आताही उमेदवारी मागितली उमेदवारी नाकारली मात्र अपक्ष म्हणून उमेदवारी करून जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत असल्याचे पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे विरोधक बेताल वक्तव्य करतात यावेळी बोलताना रुपाली मला कार्यकर्त्यांन सोबत गेले होतो प्रभाग ४ मधून राष्ट्रवादी कडून इच्छुक असताना आ रोहित पवार यांनी तुम्हाला सर्व पाठबळ देऊ तुम्ही तयारी करा असे सांगण्यात आले मात्र ऐनवेळेस माझी उमेदवारी काढण्यात आली त्यामुळे प्रभागात राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत असंतोष निर्माण झाला आहे.

यावेळी विकास राळेभात म्हणले कि – मी एकनिष्ठ कार्यकर्ता आसुन सध्या माझ्यावर अन्याय झाला आहे. मित्रांच्या बळावर निवडुन आलो भाजप बोलवत आसताना देखील मी गेलो नाही. माझी पत्नी नगराध्यक्षा असताना दहेगाव पाणी योजना, तपनेश्वर रस्ता तसेच 960 घरकुले मंजुर करुन आणले. तुम्ही दहा वर्षे काय विकास केला. आ. रोहीत पवार यांनी मी विधानसभेच्या वेळी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्या कडुन पैसै घेतले असा आरोप माझ्यावर भर सभेत केला होता. मात्र हा आरोप साफ खोटा आहे. आ. रोहित पवार हे खोटे बोलत आहेत. विधान सभेच्या वेळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मी आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पुन्हा मराठा समाज महाराष्ट्रात वेगळा विधानसभा निवडणुक लढणार नाही असे त्यांनी सांगितले व उमेदवारी अर्ज मागे घेतला असताना त्याचा राग मनात ठेवला आम्ही सर्वानी राष्ट्रवादीचे काम केले मात्र निवडणुकीत निष्ठवंत कार्यकर्त्याला डावलण्यात आले याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीला बसल्याशिवाय राहणार नाही.









