

दोन आमदारांच्या भांडणात जामखेडची जनता भरडुन निघाली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जामखेड येथे सभा संपन्न
जामखेड प्रतिनिधी
ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधात आहे, ही लढाई परीवर्तनासाठी लढाई आहे. जामखेड शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेत परीवर्तन घडवायचे आहे. दोन आमदारांकडून नीधी थांबवण्याचे काम सुरु आसुन यामध्ये जामखेडची जनता भरडुन निघाली आहे. जामखेड शहरासाठी विकासाची गंगा अनायची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाला साथ द्या असे भावनिक आवाहन शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेड येथील जाहीर सभेत व्यक्त केले.

यावेळी पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की जामखेड मध्ये आल्यावर रस्त्यांची दुरवस्था पाहुन एखाद्या खेड्यात आल्या सारखे वाटत आहे. ही निवडणूक जामखेड करांसाठी विकासासाठीची लढाई आहे. माझ्या लाडक्या बहिणींना एवढेच सांगतो मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ही लडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कारण तुमचा लाडका भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
जामखेडची भुमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आहे. मी येताना लोककल्याणाचा विचार घेऊन आलो आहे. त्यामुळे नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार पायलताई आकाश बाफना व शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या नीधी ची कमतरता कमी पडु देणार नाही. या पुर्वी प्रचंड प्रमाणात जामखेड साठी नीधी दिला मात्र एकाने आणला की एकाने थांबवायचा या सगळ्या भांडणांमुळे जामखेडची जनता भरडुन निघाली आहे. त्यामुळे या लोकांची मक्तेदारी मोडून प्रस्थापितांना घरी पाठवुन विकासाची गंगा अनायची आहे.

शेतकर्यांचा एक माझ्यासारखा मुलगा मुख्यमंत्री झाला मी विरोधकांना कामातून उत्तर दिले. अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बनवण्यासाठी मोठा नीधी दिला. शहरातील रस्ते, पाणी योजना, ड्रेनेज लाईन या सह विकास आराखडा चांगला झाला पाहिजे. तुमचे भविष्य बदलून टाळण्यासाठी शिवसेना सेवा करण्याची संधी द्या? एकदा बोलतो ते मी करतो लाडका भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे. जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या नगराध्यक्षा पायलताई आकाश बाफना यांच्या सह सर्वच उमेदवारांना निवडून द्या व मग विकास काय असतो ते पहा.
ज्योतीताई वाघमारे शिवसेना प्रवक्त्या, राजु वाघमारे उपनेते शिवसेना, बाबुशेठ टायरवाले जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख डॉ. शबनम इनामदार, तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, युवा नेते आकाश बाफना, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायलताई बाफना, संतोष वाळुंजकर, बभ्रुवान वाळुंजकर, शामिरभाई सय्यद, नितीन कोल्हे, गणेश आजबे, ऋषिकेश बांबरसे, शिवाजी विटकर, शिवकुमार डोंगरे, प्रविण बोलभट, आण्णा ढवळे यांच्या सह सर्व शिवसेना उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
मी येणार नाही अशा अफवा पसरवल्या होत्या मी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता आहे. नगर विकास खाते एकनाथ शिंदे कडे आहे, शहरात चांगले गार्डन, रस्ते दिल्या शिवाय राहणार नाही. धनुष्यबाणाला निवडून द्या असे आवाहन शिंदे यांनी केले.




