

एकजुटीने काम करुन नगराध्यक्षासह भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणणार – प्रा. मधुकर (आबा) राळेभात
जामखेड येथे भाजपची पत्रकार परिषद संपन्न, कोण आहेत भाजपाचे उमेदवार पहा सविस्तर…
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणुक मोठ्या ताकतीने लढवून नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व जागा जिंकू तसेच भाजपाने सर्व माणसातील लोकांचे काम करणारे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे चांगले यश मिळणार आहे. पक्षासोबत राहुन सर्वच उमेदवार एकजुटीने काम करणार व सर्वच्या सर्व जागा निवडुन आणणार असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केला.

आज जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपाने आज पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदाच्या २४ उमेदवार जाहीर केले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, सभापती शरद कार्ले, यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय काशिद, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, प्रविण चोरडिया, अमित चिंतामणी, पवन राळेभात, प्रवीण सानप, कांतीलाल वराट, केदार रसाळ, अल्ताफ शेख, राहुल बेदमुथ्था, बिट्टू मोरे यांच्या अनेक भाजपा पदाधिकारी व सर्व उमेदवार हजर होते.
यावेळी अमित चिंतामणी यांनी सर्वाचे स्वागत करत संजय काशिद यांनी उमेद्वारांची नावे जाहीर केले.
भाजपाचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी
प्रभाग एक-अ) सुमन अशोक शेळके
ब) श्रीराम आजीनाथ डोके
प्रभाग दोन- अ) प्रविण विठ्ठल सानप
ब) कमल महादेव राळेभात
प्रभाग तीन – अ) पोपट दाजीराम राळेभात
ब) सिमा रवींद्र कुलकर्णी
प्रभाग चार- अ) विकी धर्मेंद्र घायतडक
ब) प्रांजल अमित चिंतामणी
प्रभाग पाच- अ) हर्षद भाऊसाहेब काळे
ब) लता संदिप गायकवाड
प्रभाग सहा- अ) कोमल सनी सदाफुले
ब) गुलचंद हिरामण अंधारे
प्रभाग सात – अ) नंदा प्रविण होळकर
ब) मोहन सिताराम पवार
प्रभाग आठ- अ) शोभा दिलीप वारे
ब) युनुस दगडू शेख
प्रभाग नऊ – अ) वैशाली अर्जुन म्हेत्रे
ब) तात्याराम रोहिदास पोकळे
प्रभाग दहा – अ) मिना हनुमंत धनवटे
ब) आरीफ जमशीद सय्यद
प्रभाग आकरा – अ) संजय नारायण काशिद
ब) आशाबाई बापू टकले
प्रभाग बारा – अ) – जया संतोष गव्हाळे
ब) मोहन तुकाराम गडदे
पत्रकार परिषदेत शेवटी आभार पवन राळेभात यांनी मानले.






