

ही निवडणुक विकासाच्या मुद्यावर संपुर्ण ताकदीने लढणार – आकाश बाफना
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर…
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराच्या इतिहासात होणारी ही निवडणूक मोठी निवडणुक म्हणून ओळखली जाणार आहे. 24 नगरसेवकांन पैकी एकुण 18 उमेदवार निवडणूकीच्या रींगणानात उतरविले आहेत. तर एक नगराध्यक्षा पदासाठी पायल आकाश बाफना या शिवसेनेच्या शिंदे गटाकडुन निवडणुक लढविणार आहेत. ही निवडणुक विकासाच्या मुद्यावर संपुर्ण ताकदीने लढणार आसुन एक स्वप्नातील जामखेड बनवणार आसल्याचे देखील यावेळी आकाश बाफना आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जामखेड शहरात आज सोमवार दि 17 रोजी सायंकाळी जामखेड शहरातत शिवसेना शिंदेगटाची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी त्यांनी पक्षाच्या वतीने नगराध्यक्षासह उमेदवारी दिलेल्या 19 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या वेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आकाश बाफना म्हणाले की शिवसेनेच्या वतीने आम्ही एकुण 24 उमेदवार जाहीर केले होते. मात्र आमच्या उमेदवारांवर विरोधकांन कडुन दबाव व आमिष दाखवुन सहा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. मात्र तरी देखील आम्ही कोणाच्या दबावाला बळी न पडता एकुण सर्वच उमेदवार जिंकून दाखवु असे सांगितले. ज्या ठिकाणी उमेदवार नाहीत त्याठिकाणी अपक्षांना पुरस्क्रुत करुन सोबत घेऊ

यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने यांनी सांगितले की आमच्या काही उमेदवारांवर विरोधकांन कडुन दबाव आणण्यात आला आहे. येणाऱ्या जामखेड शहरासाठी विकासाच्या दृष्टीने ब्लुप्रिंट तयार करण्यात येणार आहे. जामखेड शहरात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत यामध्ये रस्त्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न तसेच लाईट चा प्रश्न यासह अनेक गंभीर समस्या जामखेड शहरात निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असल्याने त्यांच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत. यानंतर उमेदवार शामिरभाई सय्यद यांनी बोलताना सांगितले की जामखेडकरांना नवा चेहरा हवा होता. आणि तो चेहरा नगराध्यक्षा पदासाठी पायलताई आकाश बाफना यांच्या माध्यमातून मिळाला आहे. आम्ही सर्वच 19 उमेदवार जिंकून दाखवु असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने सर, युवा सेना तालुकाप्रमुख प्रविण बोलभट, नितीन कोल्हे, संतोष वाळुंजकर, आण्णा ढवळे, दिनेश राळेभात, गणेश आजबे, शामिरभाई सय्यद, विकी पिंपळे, शिवाजी विटकर, शिवकुमार डोंगरे, मोहन देवकाते, प्रदीप बोलभट सह सर्व उमेदवार उपस्थित होते.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे
प्रभाग एक-अ) रेखा मोहन देवकाते,
ब) कु. अंजली उल्हास माने
प्रभाग दोन- अ) रेखा कीरण मराळ,
ब) दिनेश रमेश राळेभात
प्रभाग तीन – अ) शिवाजी ज्ञानदेव विटकर
ब) – – – – – –
प्रभाग चार- अ) नमशा फईमुद्दीन शेख,
ब) विकी सदाफुले.
प्रभाग पाच- अ) विकी संतोष पिंपळे,
ब) वर्षा कैलास माने.
प्रभाग सहा- अ) पुजा अशोक सदाफुले
ब) सोहेल जावेद शेख
प्रभाग सात – अ) दत्तात्रय उर्फ (आण्णा) भिमराव ढवळे
ब) – – – – – – –
प्रभाग आठ- अ) शितल प्रदिप बोलभट
ब) शामिरभाई लतीफ सय्यद.
प्रभाग नऊ – अ) – – – – – – –
ब) तारीफ फर्मान शेख.
प्रभाग दहा – अ) जयओम जालिंदर टेकाळे
ब) – – – – – – – –
प्रभाग आकरा – अ) ऋषीकेश कीसन बांबरसे,
ब) गणेश उत्तम आजबे
प्रभाग बारा – अ) – – – – – –
ब) – – – – – – – –





