

अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमरभाई कुरेशी यांचा पदाचा राजीनामा, पक्षाला दिली सोडचिठ्ठी
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस च्या स्थापनेपासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे तसेच अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष
उमरभाई कुरेशी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत नगरपरिषदेत उमेदवारी नाकारली तसेच योग्य सन्मान मिळत नसल्याने नाराजीतून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यामुळे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का मानला जात आहे.

उमरभाई कुरेशी यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे सांगितले की शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत काम केले. नेहमीच प्रभागात मताधिक्य दिले. निष्ठेने काम केले. पण आमच्या पक्ष निष्ठेचा उपयोग काय कारण येवढे करूनही मी निवडून येणार ही खात्री असताना तरीही माझ्या पत्नीला तिकीट नाकारले यामुळे माझे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळे मी अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा व राष्ट्रवादी काँग्रेस चा राजीनामा देत आहे. दोन दिवसांत पुढील निर्णय जाहीर केला जाईल.
विद्यमान आमदार सध्या काही लोकांचे ऐकतात. यातून निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होतात. निष्ठावंतांना न्याय मिळत नाही. माझ्या पत्नीला कोणत्या कारणाने उमेदवारी नाकारली हे कारण सांगावे ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे काम दाखवावे असे आवाहन उमर कुरेशी यांनी केले.

उमरभाई कुरेशी हे सुरवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस चे क्रियाशील सदस्य होते. यांनी ग्रामपंचायत असताना व नगरपरिषद झाल्यावर निवडणूक लढवली होती पण दोन्ही वेळा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. यावेळी विजय निश्चित असताना उमेदवारी नाकारली मी अपक्ष निवडून लढविणारच आहे असे पत्रकार परिषदेत सांगितले.
उमरभाई कुरेशी यांनी आज राजीनामा देत दोन दिवसांत कार्यकर्ते यांना विचारून पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगितले. ज्येष्ठांना पण सन्मान नाही. निवडणुकीच्या तोंडावर उमरभाई कुरेशी यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का मानला जात आहे.
. 



