Home ताज्या बातम्या दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम, सोमवारी होणार भव्य...

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम, सोमवारी होणार भव्य दिव्य उद्घाटन

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम, सोमवारी होणार भव्य दिव्य उद्घाटन

उद्घाटक सभापती प्रा. राम शिंदे तर प्रमुख अतिथी मिलिंद जोशी

जामखेड प्रतिनिधी

१९५१ सालापासून जामखेड तालुक्यातील घराघरात ज्ञानाचा प्रकाश पोहचविणाऱ्या दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेस ७४ वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. या कार्यक्रमाचे भव्य दिव्य असे उद्घाटन सोमवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ल. ना. होशिंग विद्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त माजी विद्यार्थी, पालक, नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्घाटक म्हणून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मिलिंद जोशी अध्यक्ष अ. भा. मराठी साहित्य महामंडळ व कार्याध्यक्ष म. सा. प. पुणे तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख असतील.

१९५१ साली लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थापक सदस्यात स्वातंत्र्य सैनिक मधुकर देशमुख, मिश्रीलाल कोठारी, दामोदर देशमुख, लक्ष्मण देशमुख, लक्ष्मण भिडे, वसंत देशमुख स्वातंत्र्य सैनिक शेखलाल शेख हुसेन, आनंदराव काशीद, स्वातंत्र्य सैनिक जी. पी. देशपांडे, राजाभाऊ देशमुख, डॉ. बी. एम महाजन, त्रिंबक डोंगरे यांच्या विचारातून संस्थेची उभारणी झाली. आज चार माध्यमिक विद्यालय, दोन ज्युनियर काॅलेज, एक सिनियर काॅलेज, डिप्लोमा काॅलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा असा विस्तार झाला आहे. सुमारे पाच हजार मुले आज संस्थेच्या वेगवेगळ्या शाखेत शिक्षण घेत आहेत.

याविषयी आज संस्थेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव अरूण शेठ चिंतामणी, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य विकी घायतडक उपस्थित होते. यावेळी शशिकांत देशमुख यांनी सांगितले की, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
वर्षभर विविध कार्यक्रम संस्थेच्या वेगवेगळ्या शाखेत घेण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा निबंध, हस्ताक्षर, क्रीडा यासह माजी विद्यार्थी मेळावे, भव्य अशा व्याख्यानमाला, इस्त्रो सहल यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!