Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये राजकीय भूकंप: आकाश बाफना शिवसेना शिंदे गटात; निवडणुकीत नवा रंग चढला…

जामखेडमध्ये राजकीय भूकंप: आकाश बाफना शिवसेना शिंदे गटात; निवडणुकीत नवा रंग चढला…

जामखेडमध्ये राजकीय भूकंप: आकाश बाफना शिवसेना शिंदे गटात; निवडणुकीत नवा रंग चढला…

शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर जामखेडच्या रणांगणात; तरुण नेता आकाश बाफना प्रवेशामुळे समीकरणे बदलणार

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली असून तरुणांचा आयडॉल म्हणून ओळखले जाणारे आकाश बाफना यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे जामखेडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा भूकंप झाल्याची चर्चा वर्तुळात आहे.शिंदे गटाने जामखेड नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने कोणाला फटका बसेल, कोणाचे गणित बिघडेल, यावर वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आकाश बाफना यांच्या प्रवेशासोबत काही विद्यमान नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला असून आणखी काही नगरसेवक लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली जात आहे. जामखेडमध्ये मात्र महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही स्वतंत्ररीत्या लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आतापर्यंत जामखेडचे राजकारण सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या भोवती फिरताना दिसत होते.मात्र गेल्या काही महिन्यांत आकाश बाफना यांनी मैदानावर उतरून केलेले सक्रिय जनसंपर्क, तरुणांमधील लोकप्रियता आणि विविध उपक्रमांमुळे त्यांची ओळख अधिक बळकट झाली. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे जामखेड नगरपरिषद निवडणुकीत नवीन उत्सुकता, नवी स्पर्धा आणि तुफान रंगत निर्माण झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!